Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०१, २०१८

पर्यावरणदिनी लावणार ६० हजारांवर बांबूची झाडे

शासनाच्या कार्यक्रमांतर्गत होणार एक लाख वृक्षांची लागवड अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. मात्र, तत्तपूर्वी ५ जून अर्थात पर्यावरणदिनी आयुक्तांसह मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजनच्या रोपट्यांची लागवड करणार आहे. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले आहे. 
यासंदर्भात गुरुवारी (ता. ३१) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी ङेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 
नदीकाठावर बांबू आणि आजनच्या झाडांची लागवड करण्याची संकल्पना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मांडली. शासकीय वृक्ष लागवड मोहिमेत एक लाख वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी त्याव्यतिरिक्त नवा उपक्रम म्हणून नागपुरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी वृक्षारोपण केले जाईल. झोननिहाय या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून नदीचे संपूर्ण नदीच्या पात्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नदी ज्या भागातून जाते त्या भागातील प्रभागातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसुद्धा प्रशासनातर्फे या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक सफाई कामगारसुद्धा यामध्ये सहभागी होईल, अशी माहिती आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली. 
बांबू आणि आजनची वृक्ष लावण्यामागचा उद्देश असा की या झाडांना कुठलेही जनावरे खात नाही. त्यामुळे यांना ट्री गार्डची आवश्यकता पडणार नाही. नदीच्या तीरावर गाळ थांबविण्याचे कार्य ही वनस्पती करेल आणि या झाडांमुळे नदी तीराचे सौंदर्यही खुलेल. 
या संपूर्ण उपक्रमाची तयारी आजपासून सुरू झाली असून ३ जून रोजी संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. शासकीय मोहिमेतील वृक्ष लागवडीची तयारी १० जूनपर्यंत पूर्ण करायची असून तो कार्यक्रम पुढे महिनाभर चालेल. याअंतर्ग़त नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, खुले भूखंड, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
    -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...


भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.