Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १९, २०१८

आता 'व्हॉट्सअॅपमध्ये ग्रूप अॅडमिनच्या परवानगीशिवाय पोस्ट नाही.

WhatsApp rolls out 'Restrict Group' feature for admins: Report | व्हॉट्सअॅपमधील 'हे' फीचर पाहून कुणी म्हणेल 'व्हॉssट', कुणी म्हणेल 'वॉssव'! 
काव्यशिल्प/ऑनलाईन:
'व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये पडणारा मेसेजचा पाऊस कधी-कधी नकोसा होतो रे, कुणीही काहीही टाकत असतं आणि त्यावर बिनकामाची चर्चा सुरू होते, फुकटचा डोक्याला ताप...' अशी व्यथा मांडणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पण, तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रूपचे सक्रिय सदस्य असाल, धडाधड पोस्ट टाकण्यात माहीर असाल, तर मात्र व्हॉट्स अॅपचं नवं फीचर पाहून तुम्ही 'व्हॉट द फालतूगिरी' असंच म्हणाल.
आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप लवकरच 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' नावाचं फीचर आणणार असल्याचं कळतं. या फीचरमुळे फक्त ग्रूप अॅडमिनलाच ग्रूपमध्ये परवानगीविना मेसेज पाठवता येईल. इतर सर्व सदस्यांना मेसेज, फोटो, व्हिडिओ, जिफ, डॉक्युमेंट किंवा व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी अॅडमिनची परवानगी घ्यावी लागणार आहे.2.18.132 या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये 'अॅडमिन सेटिंग्स' नावाचा पर्याय ग्रूप इन्फोमध्ये समाविष्ट केला जाईल. तिथून ग्रूप अॅडमिन सदस्यांना 'रिस्ट्रिक्ट' करू शकेल. त्यानंतर, या सदस्यांना फक्त ग्रूपवरचे मेसेज वाचता येतील. त्यांना ग्रूपवर एखादी पोस्ट करायची असेल तर 'मेसेज अॅडमिन' हे बटण वापरून आधी तो मेसेज अॅडमिनला पाठवावा लागेल आणि त्यानं 'अॅप्रूव्ह' केल्यावरच तो ग्रूपवर दिसू लागले. 
हे फीचर काही ग्रूपच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. व्हॉट्सअॅप ग्रूपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या मेसेजना काही प्रमाणात आळा घालणं या फीचरमुळे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रूपवरचा वाद विकोपाला जाऊन अगदी मारहाणीपर्यंत प्रकरण गेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्यात. जाती-धर्मांत तेढ निर्माण होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढलाय. हे सगळं 'रिस्ट्रिक्ट' करण्यासाठी 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' फीचर फायद्याचं ठरू शकतं. पण, या फीचरमुळे अॅडमिनचा ताप भलताच वाढणार असल्यानं, किती अॅडमिन या फीचरचा वापर करतील, ही शंंकाच आहे.
 -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.