घरकुलाचा बांधकाम निधी मंजूर करण्यासाठी संत मीराबाई सेवा सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर यांच्यामार्फत नियुक्त गृहनिर्माण(कंत्राटी) अभियंता रमेश बंडू निकोडे याला २००० रुपये लाच घेतांना पंचायत समिती गोंडपिपरीच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहात अटक केली.तक्रारदार हे गोंडपिपरी येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या वडिलाच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाचे बांधकाम चालू असताना दोन टप्प्यात ६० हजार रुपये मंजूर करून दिल्याबद्दल तसेच उर्वरित रक्कम मंजूर करून देण्याच्या कामाकरता पंचायत समिती गोंडपिपरी येथे यांनी त्याच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र ही रक्कम मोठी असल्याने प्रथम तडजोड २ हजार रुपये देऊन करण्यात आली.हि रक्कम देत असताना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहात अटक केली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, एप्रिल २१, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments