Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०२, २०१८

'पद्मावत' सुरु असताना थिएटरमध्ये तरुणीवर बलात्कार

हैदराबाद : 'पद्मावत' चित्रपट सुरु असताना 19 वर्षीय तरुणीवर थिएटरमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर बॉयफ्रेण्ड झालेल्या तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप सिकंदराबादेतील पीडितेने केला आहे.

तीन दिवसांपूर्वी घडलेली घटना गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सिनेमा हॉल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची पोलिसांची तयारी आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

23 वर्षीय आरोपीशी पीडित तरुणीची ओळख दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती. 20 दिवसांपूर्वी दोघं सिकंदराबाद रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर दोघं आरोपीच्या बहिणीच्या घरी गेले. 21 जानेवारीला ते पुन्हा हैदराबादमध्ये भेटले. तेव्हा आरोपीने पीडितेला त्याच हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. त्यानंतर दोघांनी इंदिरा पार्कमध्ये काही काळ एकत्र घालवला.

तीन दिवसांपूर्वी सिकंदराबादमधील प्रशांत थिएटरमध्ये ते पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दोघं बसले होते, त्याच्या आजूबाजूच्या सीट्स रिकाम्या होत्या. या संधीचा फायदा घेत सिनेमा सुरु असतानाच त्याने बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.