Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ३०, २०१८

लहानग्यांना पकडुन-पकडुन दिले दो बुंद जिंदगी के...

  गजेंद्र डोंगरे
बाजारगाव-(दि.२८/जानेवारी) शासनाच्या वतीने देशभरात एकाच वेळी आयोजित केलेली पल्स-पोलिओ विशेष लसीकरण मोहीम गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतिने धड्याक्यात पार पडली.
      येथून जाणाऱ्या नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतिने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या लहानग्यांना शोधून काढून प्रत्येकाला पोलिओचा डोज पाजण्यात आला.या केंद्रावर येणारे चार मार्ग व जाणारे चार मार्ग असे आठ पोलिओ बुथ दोन पाळीत लावण्यात आले.या सोळा पोलिओ केंद्रावर एकुन ३२ स्वयंसेवक कामावर होते.त्यांनी या ठिकाणी दिवसभरात ६३६ - ०ते५ वयोगटातील मुलांना पोलिओ लस पाजुन रोगापासून आश्वस्त करण्यात आले.एकाच ठिकाणी एवढे मोठे काम झाल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साह दुणावला.या केंद्रावर सहायक संचालक आरोग्य सेवा डाँ.फारुकी,जिल्हा हत्तीरोग अधिकारी डाँ.पाठक,डाँ.वाळके यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.
      प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ३९ गावांमध्ये ही मोहीम एकाचवेळी राबविण्यात आली.यात एकुन १६५ कर्मचारी,आशा,अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला.एकुन ४५ बुथ,१९ ट्रांझिट-टिम व दोन मोबाईल-टिम असा ताफा या लसीकरणासाठी लावाण्यात आला होता.कार्यक्षेत्रातील सुमारे ३२४७ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी एकुन ३२३३ लहान-सहान मुलांना पोलिओचा डोज पाजण्यात आला.कार्यक्षेत्रात एकुन काम ९९%टक्के झाले.
       मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.योगेंद्र सवई यांच्या नेतृत्वात प्रभारी वैद्यकिय अधिकारी डाँ.सोनाली बाके,डाँ.यमुना मांडवधरे,डाँ.पवन वर्मा,आरोग्यसहायक दिनू गतफने,संजय आमटे,सरस्वती सुरजूसे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ हरीश गावंडे,प्रकाश इंगोले,प्रमोद तरवटकर,योगेंद्र चंदनखेडे,देवानंद भगत,सुनिल आत्राम,औनिअ अधिकारी अजय काठोळे,दिलीप ठाकरे यांचेसह सर्व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका व आशा स्वयंमसेविकांनी अथक परिश्रम केले.
फोटो....!


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.