Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १४, २०१७

आमदार चषक विदर्भ कबड्डी सामन्यांचे उदघाटन आज

 परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री 
एकनाथराव  शिंदे व महसूल मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती

वरोरा/ भद्रावती (शिरीष उगे)
जय हिंद क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा स्व. सुनील नारायण धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार बाळूभाऊ धानोरकर चषक विदर्भ स्तरीय पुरुष व महिला कबड्डी सामन्यांचे आयोजन दि १४,१५,१६ व १७ डिसेंबर ला स्व. उत्तम मेश्राम स्टेडीयम, कॉटन मार्केट वरोरा येथे आयोजन केले आहे.
   आज दि. १४ ला सायं. ६ वाजता कबड्डी सामन्यांचे उदघाटन समारंभ पार पडणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते, अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे उपस्थित राहणार असून  प्रमुख अतिथी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधानपरिषद सदस्य तानाजी सावंत , आमदार प्रताप सरनाईक, आमदार शुभाष भोईर, आमदार अजय चौधरी, आमदार कुडाळकर, आमदार हेमंत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुनील शिंदे, आमदार रमेश लटके, आमदार डॉ राहुल पाटील, आमदार तृप्ती सावंत, माजी आमदार विश्वासराव नांदेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवर, संजय देरकर, आभास शिंग प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.  या कबड्डी स्पर्धेत विदर्भातून विविध जिल्यातून थरारक स्पर्धक स्पर्धेस सहभागी होत आहे.  या स्पर्धेचा वरोरा भद्रावती वासीयांनी अवश्य लाभ घ्यावा असे आयोजक भद्रावती- वरोरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.