Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १४, २०१७

हमालाच्या अंगावर रॉकेल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर येथील गंजवार्ड परिसरात हमालाच्या अंगावर रॉकेल टाकून जीवंत जाळल्याची घटना घडली.गंजवार्ड परिसरात दोन व्यक्तित अचानक वाद झाला  त्या वादातुन ही घटना गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे.कांचा असे या जळालेल्या व्यक्तीचे नाव असून तो गंज वॉर्ड येथे हमालीचे काम करायचा. तर देविदास गंगाधर धामनगे रा. कन्नमवार चौक असे आरोपीचे नाव असून आरोपीने शहर पोलिस स्टेशनमध्ये शरनागती पत्कारली असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार कांचा व देविदास याचात काही कारणास्तव वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. व आरोपी देविदास ने कांचा च्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला.सध्या कांचा ची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा करिता दाखल आले आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.