Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १३, २०१७

पोलिस उपनिरीक्षक राजमोहन सिंह निलंबित

वसूलीची ‘ऑडिओ क्लिप व्हायरल' प्रकरण

नागपूर : नवीन कामठी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाच्या वसुलीच्या संभाषणाची `ऑडीओ क्लिप' व्हायलर होताच वरिष्ठांच्या आदेशाने संबंधीत कर्मचाNयांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती आज १२ डिसेंबरला `डीबी स्कॉड'चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजमोहन शिवलाल सिंह यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.
पोलिस आयुक्तालयाच्या कडक कारवाईची आज दिवसभर पोलिस कर्मचाNयात चर्चा ऐकायला मिळाली. यासंदर्भात नवीन कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललित वर्टिकर यांनी राजामोहन सिंह यांना निलंबीत करण्यात आल्याचे सांगितले. ऑडीओ क्लिपमध्ये पोलिस उपनिरिक्षक आर एस सिंह हे एका सहकर्मी पोलिस कर्मचाNयाशी मोबाइलवर बोलत असतांना त्यांनी गौवंश प्रकरणात १० हजाराची `सौदेबाजी' केल्याचे चर्चेदरम्यान सांगितले होते. आणि त्याच कर्मचाNयाने ही क्लिप व्हायरल करुन सिंह यांचा गेम केल्याची चर्चा आहे.  पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशन्वाये पीएसआय सिंह यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पी. आय. ललित वर्टिकर यांनी दिली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.