Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १३, २०१७

शाळाबाह्य कामे बंद करा

चंद्रपूर : शिक्षकांचे कार्यच मुळात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ज्ञानी करण्याचे आहे. गावखेडी आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच आहे. मात्र, शिक्षकांवर शाळाबाह्य कामे लादून त्यांची अध्यापनक्षमता नष्ट करीत आहे. हा प्रकार तातडीने बंद करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिक्षकांना अध्यापनाच्या पलिकडची कामे दिली जात आहे. या अशैक्षणिक
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, उपाध्यक्ष दिगांबर कुरेकार, सुनील शेरकी, विजय टोंगे, प्रभाकर पारखी, सुरेंद्र अडबाले व अन्य शिक्षक उपस्थित होते.
कामांमुळे विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने माध्यमिक शाळेतील शिक्षकांना बीएलओ बुथ आॅफीसर ही अत्यंत किचकट स्वरूपाची जबाबदारी सोपविली. हे अशैक्षणिक काम करण्याचा आदेश जारी करण्यात आला. शासनाच्या विविध जबाबदाºया शिक्षकांवर सोपवून शासन अन्याय करीत आहे. हा प्रकार बंद करून शासनाने शिक्षकांना अध्यापनापलिकडे कामे सोपवू नये, अशी मागणी संघटनेने या निवेदनातून केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.