12 एप्रिलपासुन होता फरार.
रामटेक तालुका प्रतिनिधी-रामटेक व मौदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यानंकडून लाखो रूपयांची तूर,चना,गहु व धानपीकाची खरेदी करून संबधित रकमेचे धनादेश देवून या भागातील अनेक शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या मौदा तालुक्यातील नंदापुरी येथील प्रफुल्ल मोरेश्वर चाफले या भामटयास अटक करण्यांत रामटेक पोलीसांनी अखेर यश आहे आहे.
सहा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी व रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोहर जंगवाड,तारूदत्त बोरसारे,पोलीस हवालदार उमेश ठाकरे व अन्य पोलीस कर्मचारी यांनी या आरोपीस दिनांक 1 डिसेंबर 2017 रोजी ताब्यात घेतले आहे.सदर आरोपी हा गेल्या 12 एप्रिल 2017 पासून
फरार होता.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की उपरोक्त आरोपी याने रामटेक मौदा व पारशिवणी,गहु व धान मोठया प्रमाणावर विकत घेतले.नोटाबंदी झाली होती त्यामुळे आपण आपणांस नगदी चुकारे देवू देवू शकत नसल्याचा बहाणा या भामटयाने केला. शतकर्यांनी त्याच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवला व पुढिल तारखेचे धनादेश
स्विकारले मात्र ती तारीख आल्यावर शतकर्यांनी ते धनादेश आपल्या खात्यात वटविण्यासाठी जमाकेले तेंव्हा ते वटले नाहीत.म्हणुन त्यांनी त्यास गाठण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला होता.अखेर निराश शेतकरी यांनी रामटेक पोलीस ठाण्यांत याबाबत तक्रार नोंदविली.रामटेक पोलीसांनी या आरोपीविरूदध भादंवीच्या 420,34
कलमाखाली गुन्हयाची नोंद केली व तपास प्रारंभ केला होता.
उपरोक्त आरोप याचेबाबत रामटेकचे पोलीस उपअधिक्षक लोहीत मतानी यांना याबाबत गुप्त माहीती मीळाली दृत्यांनी आपल्या कार्यालयातील पथकाला याबाबत त्वरीत आदेश दिले व या भामटयास जेरबंद केले.या आरोपीस पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.याप्रकरणी नायक पोलीस सतिश ,प्रदिप यांना
मोलाचे सहकार्य केले.