पारशिवणी तालुका प्रतिनिधी:
तालुक्यातील खेडी (खोपडी) गावातील पीडित शेतकरी प्रकाश पंजाबराव इंगळे याने अशोक दादाराव गावंडे यांच्या कडून ठेक्याने केलेल्या शेतात पिकविलेल्या धानाचे पिकाची गंजी शेतात लावलेली असताना अचानक पने धानाच्या गंजीला आग लागली ज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे दोन लाखाच्या नजीक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुक्या सह क्षेत्रातिल शेतकऱ्यांच्या पिकाला आधीच धरणाचे पाणी न मिळाल्याने शेतकरी चिंतातुर होता.ज्या मुळे ५३% टक्के,४ हजार ९८० हेक्तर शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याच्या अभावाने नापेर राहिलेल्या होत्या.
तर कसा बस प्रयत्न करून काही शेतकऱ्यांनी धानाचे पीक घेऊन आपला उदरनिर्वाह व कर्जाची थोडी फार रक्कम फेडण्याची तयारी केली परंतु शेतकऱ्यांच्या नशिबाला आस्मानी किंवा सुलतानी दाहकता येईल याचा काही नेम नाही.कन्हान उपशहरा लगत ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या खेडी (खोपडी) येथे शेतकरी प्रकाश पंजाबराव इंगळे हे शारीरिक दृश्य सुदृढ नसताना देखील शेतीला प्रथम प्राधान्य देतात गावातीलच अशोक दादाराव गावंडे या शेतकऱ्याची चार एकर शेती ६० हजार रुपयांच्या मोबदल्यात ठेक्याने केलेली होती.शरीराने सुदृढ नसताना देखील इंगळे यांनी चार एकरात धानाचे उत्तम पीक घेतले व धानाची कापणी करून त्याची गंजी
शेतातच लावून ठेवली.शुक्रवार ता.१५ च्या रात्री शेतातील चारही एकरातील धानाच्या गंजीला एका एकी आग लागली ज्यात संपूर्ण धान पीक आगीच्या भक्षस्थानी ठरले.
ही धक्का दायक घटना शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०१७ पीडित शेतकऱ्या कडून कुणी तरी अज्ञात इसमानी धानाच्या गंजी ला आग लावून पसार झाल्याचा संशय घेतल्या जात आहे.आगीच्या भक्षस्थानी पीक गेल्याने इंगळे यांच्या वर आर्थिक रित्या संकट कोसळलेले आहे.अश्यात प्रशाशनाणे आर्थिक सहकार्य करण्याची मागणी इंगळे सह क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे