Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

मित्रानेच केली मित्राची हत्या

चंद्रपूर प्रतिनिधी :
tash pate साठी इमेज परिणामजुगार खेळतांना हरलेले पैसे न दिल्याने मित्राने मित्राचीच हत्या केल्याची घटना चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरात घडली. सोनू आणि शंकर दोघे मित्र नेहमी जुगार खेड्याचे जुगाराचे हे व्यसन सोनूला इतके भारी पडेल असे त्यांनी काही विचारही केला नसावा असेच काही घडले.
                                                       दोन दिवसाअगोदर सोनू शर्मा व शंकर झाडे हे दोन मित्र परिसरातील साथीदारांबरोबर जुगार खेळायला बसले.यात सोनू शर्मा हा जुगार हरला मात्र पैसे नसल्याने सोनू हा शंकरला पैसे  परत करू शकला नाही.शंकर हा सोनूच्या घराकडे जाऊन पैसे मागायला गेला असता सोनू व शंकर यांच्या पैस्याच्या वादातून बाचाबाची झाली हा वाद इतका विकोपाला गेला कि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले व शंकर याने  थेट धारधार शत्राच्या  साहाय्याने सोनूच्या डोक्यावर घाव दिला यात सोनू गंभीररित्या जखमी झाला त्याला परिसरातील नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले मात्र उपचारादरम्यात सोनूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कळविले.
                            त्यामुळे परिसरात काही काळ माहोल एकदम गरम होत.याबाबदची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भगत यांना मिळताच त्यांनी आरोपी शंकर झाडे यास  महाकाली परिसरातून ताब्यात घेतले व घटनास्थळाचा  पंचनामा करत पुढील तपास  सुरू ठेवला. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.