Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १६, २०१७

मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं.
रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.
त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवरुन संबंधीत मेसेज व्हायरल झाल्याचं आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्‍यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची कदाचित ही पहिलीच घटना आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.