औरंगाबाद : दादर - जालना जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेचे इंजिन शनिवारी (ता २८) कसारा घाट, इगतपुरी दरम्यान बंद पडले. चालत्या अवस्थेत गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन बंद पडल्याची माहिती सुत्रांनी दिली. अचानक बंद पडलेल्या इंजिनमुळे जनशताब्दी एक्सप्रेस साधारण दोन तास जागीच उभी होती. परिणामी मुंबईहून येणाऱ्या रेल्वेगाड्या खोळंबल्याचे चित्र होते. नंदीग्राम एक्सप्रेसही अर्धा ते एक तास लेट येईल अशी माहिती देण्यात आली.
जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन बंद