बल्लारपूर: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभुल केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ करून जनतेला वेठीस धरले. शेतकºयांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. भाजपचे सरकार जनघातकी धोरण राबवित असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने भाजपचे अच्छेदिन पण, जनतेचे काय? या कार्यक्रमातर्गत बल्लारपूर येथील नगरपालिका चौकात अच्छे दिनचा निषेध करण्यासाठी जनतेला गुलाब पुष्प भेट देण्यात आला. बल्लारपूर येथील कार्यक्रमात मजदूर महासभेचे महासचिव वसंत मांढरे, माजी नगरसेवक नासीरखान, नगरसेवक भाष्कर माकोडे, अॅड. पवन मेश्राम, अॅड. मेघा भाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ टोंगे, माजी उपसभापती अनकेश्वर मेश्राम, नाना बुंदेल, रामदास वाग्दरकर, गजानन दिवसे,बाबुराव जुमनाके, महेश सदाला,जयकरणसिंह बजगोती,मयूर परसूटकर उपस्थित होते.