Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २७, २०१७

चंद्रपुरात भाजपला टोचन्या देत काँग्रेसची ब्यानरबाजी


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात शहरात कांग्रेस पक्ष सद्या रोज ना-ना विविध कारणांवरुण माध्यमात चांगलाच गाजत आहे. असाच
आणखी एक नवीन कारनामा चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यापासून सरकार कडून गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात थेट चंद्रपूर बसस्थानक ऊड्डाणपुल परिसरात
मोठा ब्यानरच लावलेला दिसतो आहे.आज परियंत येथे शहरातील कोचिंग क्लासेस,आभूषण विक्री,खाजगी जहिरातीचे ब्यानर लागत होते .मात्र आज तिथे सरकार विरोधातील ब्यानर दिसत असल्याने शहरभर या काँग्रेसच्या ब्यानरबाजीची चांगलीच चर्चा सुरु आहे.

या ब्यानरवर सरकारला टोचन्या देत ठळक अक्षरात लिहिले आहे की ज्या काँग्रेस सरकारला गॅसचे भाव 396 रुपये करण्यासाठी 45 वर्ष लागली त्या तुलनेत या सरकारला भाववाढ करण्यासाठी फक्त 3 वर्ष लागली ,3 वर्षात भाजप सरकारने  रूपयाचा गॅससिलेंडर 784 रुपये केल्याबद्दल सरकारला उलटा टोमना देत महगाई कमी केल्याबद्दल व सामान्यांना अच्छे दिन दाखविल्या बद्दल अभिनंदन,आभार,आणि धन्यवाद करत आहे, असे लिहण्यात आले आहे. सरकारने समान्यांचा व गरीबांचा विचार करत भाववाढ नियंत्रित केली पाहिजे,मात्र या सरकारला कमीत कमी जनाची नाही तर मनाची लाज नाही !!!!!! अश्या आशयाचा हा ब्यानार सद्या शहरातील नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनला असून ब्यानर लागलेल्या ठिकाणी शहरातील नागरीक थांबुन वाचू लागले आहे.

त्यामुळे ही कोंग्रेसची सरकार विरोधी पोस्टरबाजी चंद्रपूर शहरात क़ाय बदल घडवुन आणते.हेच बघने योग्य ठरणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.