Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर १४, २०१७

"अस्तपैलू अभियंते - डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या...!"


श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मो. ९९७००५२८३७

आज १५ सप्टेंबर,म्हणजे भारतरत्न सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त जागतिक अभियंता दिन म्हणून साजरी करतो, थोर स्थापत्य शास्त्रज्ञ असलेले सर विश्वेश्वरय्या हे भारतातील एक महान व पाहिले अभियंता म्हणून ओळखले जाते,पेशाने स्थापत्य असूनही अभियांत्रिकेच्या प्रत्येक शाखेच्या ज्ञानाची खान आपल्या अंगी बाळगणारे आजच्या अभियंतेला आदर्श असा व्यक्तिमहत्व या देशाला लाभले हे भाग्यच....

कुठल्याही देशाची सर्वांगिण प्रगती ही अभियांत्रिकीवर अवलंबून असते. वाहतूक व्यवस्था, उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, बांधकाम, यंत्रे, दूरसंचार, वैद्यकीय, प्रसार माध्यमे, शेती, अवकाश यामध्ये विकास अभियांत्रिकीमुळेच घडून आलेला आहे. याच क्षेत्रामध्ये सातत्याने होणार्‍या क्रांतिकारी बदलास अभियांत्रिकी हेच पर्यायी उत्तर आहे. या क्षेत्रातील समस्या, उपलब्ध तंत्रज्ञान व संशोधनातून विकसित होत आहेत. या बदलांच्या प्रक्रिया जो देश स्वीकारतो त्या देशाची अर्थव्यवस्था त्या बदलांशी निगडित असते,अर्थातच सामाजिक जडणघडणातील सर्व गोष्टी एक अभियंतेच्या नेतृत्वाने साकारले जाते, अनेक शास्त्रज्ञे आपल्या अस्तित्वाची पर्वा नकारता या देशातील विविध क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त करून,देशाला एक वैज्ञानिक दृष्टीक्षेपात मापण्याचं कार्य या अभियंताने केले,त्यातलंच उधाहरण म्हणजे भारतरत्न सर डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेणे बंधनकारक ठरेल.

यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.वयाच्या १२व्या वर्षी पितृछत्र हरवल्याने कौटुंबिक जबाबदारी अगदी लहान वयात त्यांनी पार पाढली त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात मात्र कुठे अडथळा येऊ दिले नाहीत,त्यांनी कला क्षेत्रातील पदविका प्राप्त करून अभियंता होण्याच्या स्वप्नाला उजाळा देण्यास बळ मिळाले व त्यांनी त्यांच शिक्षण पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन सातत्य काटकसरीने पार पाडले व समाजात स्थापत्य अभियंता म्हणून बाहेर पडले, सर मोक्षगुंडम यांच्या चिकित्सक बुद्धीला केवळ एकाच शाखेचे ज्ञान नसून अभियांत्रिकी क्षेत्रातल्या जवळजवळ ३२ शाखेचे ज्ञान प्राप्त करून घेणारं जगातले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या... अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या PWD मध्ये अभियंता म्हणून रुजू झाल्या नंतर त्यांनी,केवळ अभियंता ही एकच पेषेचा पैराव न करता,स्वतंत्र देश्याच्या रणांगणातही खूप मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली,देशातील अनेक भागांच्या विकासाठी त्यांनी धडपडले १९८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली.१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टीम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली आणि त्याच बरोबर देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर ‘प्लांड इकोनोमी फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे. व्यापार आणि उद्योगधंदे वाढीसाठी त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ ची स्थापनाही केली.



डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेऊन, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले,अश्या महान व्यक्तिमत्व या देशाला लाभले हे आपले भाग्यच ना,आज आपल्या सामाजिक जीवनात वावरत असतांना अनेक गोष्टी नजरेत येतात,अभियांत्रिकी म्हणजे केवक कचरा हा शब्द मला तर नेहमीच कानावर पडणारे ठरले आहेत, देशाच्या आर्थिक असो वा सर्वांगीण विकासासाठी असो प्रत्येक क्षेत्राला अभियंता असणे हे तर साहजिकच आहे, त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तुत्वाला वाव मिळणेही तेवढेच महत्वाचे असो,काही वर्ष पाठीमागे वळून पहिलात तर,शैक्षणिक क्षेत्रातील एक गोष्ट नक्कीच आठवेल,ग्रामीण असो वा शहरी या दोन्ही भागातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राला मिळणारा दर्जा उत्तेजनकच होती,अत्ता ठीक प्रस्थापित घडामोडीचा विचार केला तर अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे वर्षेंवर्षं आवड व प्रवेशद्वार बंद होत चालली आहे,गतवर्षी काही महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली तर या वर्षीची महाविद्यालयात २० हजार जागा रिक्त आहेत,याचे कारण त्या क्षेत्राकडे बागण्याचा दृष्टीकोन बदलत गेला आहे,यावरून त्या क्षेत्राची किंमत कमी ठरवता येत नाही...
अभियंता कसा असावा असं म्हटल्यास मी मात्र एकच उत्तर देईल, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सारखा पण का,कारण कार्य आणि परिवर्तन यातला जितका फरक दर्शवितो तितकाच फरक आपल्या अभियांत्रिकेतून कार्य करावे का परिवर्तन ह्या प्रश्नाचे निरसन झाल्यास समजते,सर मोक्षगुंडम यांच्या जीवनात एक छोटा प्रसंग घडला होता,मैसूर परिसरात जलमार्ग जाणाऱ्या काही जहाजे एका विशिष्ट ठिकाणि पोहचताच लाठ्यांच्या प्रवाहात अडकून नुकसानीच्या खाईत जायचे,यावर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या अभियांत्रिकी युक्तीने त्या विशिष्ठ ठिकाणी एक जहाज पाण्याखाली बुडबून ठेऊन तेथील लाठाचा वेगास तिर्थता देण्यास यशस्वी ठरले,असे अनेक प्रांगणात त्यांनी आपली युक्ती लढवून होण्याऱ्या नुकसानीस थांबा घातला,अर्थात कुठलेली बेस हे पुस्तकी पेक्षा व्यवहारिक दृष्टीने पाहणारे एक देशातील महान अभियंता,भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची आज जयंती,मला अभिमान आहे मी स्थापत्य अभियांत्रिकेचा विद्यार्थी असल्याचा,आणि आज माझ्या अभियंतेचा गौरवशाली दिवस,देश्याच्या डिजीटल वाटचालीस सर्वोत्कृष्ट रात्रंदिन कार्य करणाऱ्या माझ्या सर्व अभियंताना शुभेच्छा व भारतरत्न डॉ.सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.