बुटिबोरी : नागपूर-वर्धा मार्गावरील बुटीबोरीवरून 5-6 किमी अंतरावर टाकळघाट फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ट्रक व ट्रेलरच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले.
साखर घेऊन जाणारा ट्रक (क्र. सीजी 04 डीजी 8112) वर्ध्याकडे जात होता. या ट्रकचा टाकळघाट फाट्याजवळ टायर फुटल्याने समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलर (क्र सीजी 07 सीए 4151)ला जोरदार धडक बसली. ट्रेलरमध्ये 16 लोखंडी खांब बुटीबोरीकडून जबलपूरला नेण्यात येत होते. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा दर्शनी भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेत दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला.