नागपूर : छिंदवाडा जिल्ह्यातील जुंगवाही गावाजवळ ट्रक- मारुती स्वीफ्ट कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन डॉक्टरांसह पाच जण ठार झाले. ही घटना 30 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली.
मृतात नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. अनिल गोल्हर यांचा मुलगा डॉ. साकेत गोल्हर, खापरखेडा येथील डॉ. आशिष बांडोले, वैद्यकीय प्रतिनिधी सत्येंद्र अवदेश सिंग, विजय ठाकरे आणि हॉस्पिटल कर्मचारी यांचा समावेश आहे. हिंगणा मार्गावरील लता मंगेशकर हास्पिटलमध्ये कार्यरत डॉ. साकेत गोल्हर हे पचमेढी येथे आरोग्य शिबिराकरिता चार जणांसह गेले होते. परत येताना त्यांच्या मारुती स्वीफ्ट एम. एच. 40/एसी 5852 ला ट्रकने धडक दिली. यात पाचही जण ठार झाले.