Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १३, २०१४

शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार

सुनील मडावी (३२) नक्षल शोध मोहीम राबवून परत येत असताना येडानूर जंगल परिसरात नक्षल्यांच्या भूसुरुंग स्फोटात रविवारी गडचिरोलीत शहीद झाला. त्याचे पार्थिव सोमवारी दुर्गापुरात आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात व अंत्यत शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



वडिलाच्या विरोधाला बगल देत देशसेवेचे व्रत उराशी बाळगून सुनिल तुकडू मडावी ७ जुलै २00६ रोजी पोलिसात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची गडचिरोली येथील नक्षल विरोधी विशेष अभियान पथकात नियुक्ती करण्यात आली. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत असताना काळाने त्याच्यावर झेप घेतली.

दोन दिवस नक्षल शोध मोहीम राबवून गडचिरोलीत परत येत असताना नक्षल्यांनी भूसुरंग स्फोट घडवून आणला. यात इतर जवानांसह सुनील शहीद झाला. दुर्गापुरात ही घटना माहीत होताच सर्वत्र शोककळा पसरली. लगेच त्याच्या कुटुंबीयांनी गडचिरोली गाठली. सोमवारी ११.४५ वाजता त्याचे पार्थिव दुर्गापुरातील त्याच्या राहत्या घरी आणण्यात आले. ख्रिश्‍चन विधीनुसार प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर आर.सी.बी.च्या जवानांनी साधी सलामी दिली. नंतर अंत्ययात्रेला प्रारंभ झाला.

पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस वाहनाने अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा तुकूम येथील ख्रिश्‍चन स्मशानभूमीत आल्यानंतर पोलीस अधीक्षक राजीव जैन, पोलीस उपअधीक्षक राजु भुजबळ यांच्या उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांनी सलामी दिली. ख्रिश्‍चन निधीनुसार अंत्यत शोकाकूल वातावरणात सरकारी इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.