Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ११, २०१४

आशिष अंबाडे यांना नारद पुरस्कार जाहीर

चंद्रपूर- विश्‍व संवाद केंद्राच्या वतीने नारद जयंतीचा कार्यक्रम पत्रकार दिन म्हणून रविवार, ११ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात प्रदान  करण्यात आला आहे. उदयोन्मुख पत्रकार म्हणून चंद्रपूरचे आशिष अंबाडे यांची नारद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आशिष अंबाडे यांना ५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले ।  आशिष अंबाडे हे २००५ पासून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. श्रमिक पत्रकार संघाचे ते सदस्य असून, नाट्य क्षेत्रांत निर्मिती प्रमुख म्हणून काम केले आहे.

आशिष आंबाडे यांच्या बातम्या

ताडोबात आला नवा पाहुणा! New Guest in Tadoba


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.