Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १९, २०१४

व्हॉट्स‘आप’


‘चट’ पक्षांतर, ‘पट’ उमेदवारी

देवनाथ गंडाटे :
--------------------
लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होताच निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच रंग घेतला आहे. होळीच्या पर्वावर अनेकांनी एकमेकांना शुभसंदेश आणि रंगपंचमीचा गुलाल पाठवून जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. त्यातही सोशल मिडियाच्या माध्यामा तून चांगलाच प्रचार सुरू केला आहे. मोबाईल एसएमएसपेक्षाही भारी वजन असलेल्या व्हॅॉट्सअपचा लाभ आम आदमी पक्षाने घेतला आहे. म्हणायला आम आदमी असलेतरी अनेकांजवळ महागडे मोबाईल आणि त्यात टूजी, थ्री जी कनेक्शन आहेत. त्यामुळे व्हॉॅट्सअॅपवर ‘आपचे अकाउंट सुरू झाले आहे.
चंद्रपूर सारख्या शहरातील अनेक नवतरुण माध्यमातून आपला उमेदवाराचा प्रचार सुरू केलेला आहे. शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांनी आम आदमी पक्षात ‘चट पक्षांतर, ‘पट उमेदवारी मिळविली. गत पाच वर्षांपासून लोकसभेसाठी तालीम करीत असलेल्या चटपसारखा चेहरा आपला मिळाल्याने विजयाची मोठी शाश्वती निर्माण झाली आहे.
तरुण, वयस्क , शेतकरी आणि महिला वर्गात चपटांचे नाव पोहोचविणसाठी गावातील प्रमुुख मोबाईल क्रमांक आणि अनेक ग्रुपमध्ये जुळून, नवीन क्रमांक शोधून एसएमएस पाठविले जात आहे. ‘ नया है वह टपोरी डॉलॉगला हाणून पाडण्यासाठी आता ही तरुण मंडळी कुछ करके दिखाना है, चटप को चुनके लाना है, अशी म्हण पुढे आणून प्रचाराची धुरा वेगात सुरू केली आहे.
आपल्या हातात असणारा, कान आणि डोळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मनोव्यापार आणि भाव विश्वाला व्यापणारा मोबाइल आता जणू शरीराचा एक भागच बनला आहे. अगदी खेड्याातील रोजंदारीवर काम करणा-या अशिक्षित तरुणांपासून तर फ़ेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमय जगणा-या शहरी माणसार्पंत पोहचणसाठी हे आम तरुण राजकारणाचा कोणताही गंध नसताना देखील रात्रंदिवस एक करीत आहेत.
ऑनलाइन कट्टयावर मात्र ‘पॉलिटिकल टिवटिव बहर येऊ लागला आहे. व्हॉट्सअॅॅपच्या एका ग्रुपवर सर्वपक्षीय मित्रपरिवार असल्याने अनेक वाद विवादसुद्धा वाचाला मिळत आहेत.
सोळाव्या लोकसभेचं रणशिंग सुरू झाल्या नंतर पोस्टर-बॅनरयुद्धाला सुरुवात झाली आहे.. मतदाराला आपले करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. कारण त्यांना ठाऊक आहे की, एक दिवसापुरता का होईना, तो ‘राजा’ असणार आहे म्हणून त्याला तसं भासवणं तरी भाग आहे. म्हणून सगळा आटापिटा चालला आहे. आरोप-प्रत्यारोपाची राजकीय धुळवड तर आधीपासून सुरू झाला आहे.
निवडणूक नुसती जाहीर झाली आणि गावागावातलं वातावरण बदलू लागले आहे. यंदा चटप आणि आपच उमेदवारीमुळे अचानक वेगळी हवा वाहू लागली आहे. एरवी निष्किय असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम चैतन्य दिसून येत आहे. तरुणांना बदल अपेक्षित आहे. विकासाच दृष्टीने नवा शिलेदारदेखील. त्यामुळे निवडणूक हा विषय सगळ्यांनी अतिशय गंभितेने घेतलेला दिसू लागला आहे. टीव्ही आणि न्यूज चॅनेलचं प्रस्थ असलेला काळात तरुण मंडळी कधी नव्हे यंदा निवडणुकीची चर्चा करू लागले आहे. गली पासून दिली पर्यंतचे विषय चर्चीले जात आहेत. प्रत्येक जण राजकारणातला तज्ज्ञ असल्यासारखा त्यात सह्भागी होऊ लागला आहे. पूर्वी उमेदवार जाहीर झाल्याचं वर्तमानपत्रांतून कळायचं आणि ख-या अर्थाने लगबग सुरू व्हायची. आता मात्र तसे राहिलेले नाही।फ़ेसबुकआणि व्हॅट्सअॅपमुळे क्षणात माहिती कळू लागली आहे.
व्हॉट्सअप-टेलिग्रामवरून मेसेजस पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी या मेसेजेसमुळे काही ङ्गरक पडणार नाही, असा समज करून बसलेल विरोधी पक्षांचा निकाल 16 मे रोजी रखरखत्या उन्हात लागेल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.