Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २३, २०१४

आपचा उमेदवार तळ्यात-मळ्यात

आपचा उमेदवार तळ्यात-मळ्यात

भाजप, कॉंग्रेसचे  उमेदवार ठरले

चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील वणी- आर्णी लोकसभा मतदार संघासाठी विविध पक्षाने उमेदवार निश्चित करणे सुरु केले आहे. येथून माजी खासदार नरेश पुगलिया ऐवजी संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. तसे न झाल्यास माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळू शकते. भाजपचा उमेदवार पूर्वीपासूनच निश्चित आहे. हंसराज अहिर यांनी माजी राष्ट्रपती कलाम यांना बोलवुन प्रचाराचा नारळ फोडला. आपचा उमेदवार ठरविण्यासाठी मोठी कसरत सुरु आहे. माजी आमदार वामनराव चटप यांनी उमेदवारी मागितली असली तरी कार्यकर्ते नवीन चेहरा हवा असा आग्रह धरून आहेत. त्यामुळे बंडू धोत्रे यांना उमेदवारी द्यायची कि चटप यांना संधी द्यायची याचा निर्णय येत्या २८ रोजी होणार आहे. मनसेने उमेदवार उभा करण्यासाठी कोणताही विचार केलेला नहि. आता याशिवाय बसप, डाव्या आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे सुध्या स्पष्ट झाले नाही. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.