Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०३, २०१४

नितीन पोहाणे

आम आदमी ते उद्योगपती 
समाजसुधारक ते राजकारण 

हिंदीत नितीनचा अर्थ शांत असा होतो. अगदी अशाच स्वभावाचा नितीन आम आदमी ते उद्योगपती असा प्रवास करून समाजकारणातून राजकारणाकडे  वळत आहे. चंद्रपुरातील पठाणपुरा येथे सामान्य परिवारात जन्मलेले नितीनचे वडील किराणा दुकान चालवीत असत. नितीनने शिक्षणानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. त्यानन्तर निप्पो कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून अनेकांना शुद्ध पाणी मिळू लागले. गेली अनेक वर्षे हा उद्योग विस्तारल्यानंतर मिळणा-या  वेळेतुन सामाजिक उपक्रम सुरु केले. आपल्या वाढदिवसानिमित्त स्थानिक चांदा क्बल मैदानावर सर्व क्षेत्रातील समाजसुधारक आदर्श व्यक्तींचा सत्कार केला. मुंबई, दिल्ली, नागपूर, नासिक, नांदेड, हैदराबाद येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समाज सुधारक अशी उपाधी लावून संघटण स्थापन केल्यानंतर
 अनेकांनी नितीनला वेडा ठरविले. पण नितीनने टीकेकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले. नितीन पोहाणे यांच्या नेतृत्त्वात इ मीटर विरोधात ऑटोचालकांचा मोर्चा काढत सरकारच्या आदेशाचा विरोध व्यक्त केला. मात्र वृत्त वाहिन्याचा पसारा असतानांही कुणी दखल घेतली नाही. मोर्च्याचा प्रतिसाद बघता अनेक राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटना अचंबित झाल्या. नितीन ने मध्यंतरी कांजी' ला लघुचित्रपट साकारला होता. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे करण्याचा नितीन चा प्रयत्न असतो. मोठी स्वप्ने बघून ती साकारण्याचा प्रयत्न नितीन करीत असतो.
कुठल्याही पक्षात किंवा संघटनेत कार्यकारी मंडळ वा कार्यकारीणी असा एक मोजक्या महत्वाच्या सदस्यांचा गट असतो. पदाधिकारी वा नेत्यांच्या नावाने वा नेतृत्वाखाली चाललेल्या कारभाराला वेळोवेळी सल्लामसलत करायला किंवा आढावा घेण्यात मदत करायला असा गट सज्ज असतो. झालेल्या कामाचे अवलोकन करून त्यातल्या त्रुटी दाखवणे, त्याची चाचणी वा छाननी करणे, सुधारणा सुचवणे; यासाठी ही समिती मदत करत असते. अशी समिती नितीन ने   स्थापन केली नाही. मात्र जाणकाराचे सल्ले घ्यायला ते विसरत नाहीत. शांत स्वभाव असला तरी प्रसंगी चुकीच्या बाबींना कडाडून विरोध करतो. अनेकदा त्याच्या स्मार्ट राहनीमानावर टीका होते. सूट बुटाचा तरुण समाज सेवा करेल काय, असा प्रश्न उपस्थित करतात. पण, नितीन ला नीट नेटकेपणा आवडतो. वक्तशीरपणा आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती कायम आहे.  समाजकारणातून राजकारणाक डे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे. समाजकारणातून राजकारणाकडे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे.
आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी फ़ेसबुक व मोबाईल माध्यमातून लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला होता. मग त्याचे प्रतिबिंब माध्यमातून पडत गेले. आंदोलनात मिळणारा प्रतिसाद मिळाल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा पवित्रा घेतल्याने जुन्या प्रस्थापित नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे.  राजकारण म्हणजे घाण, उकिरडा, भ्रष्टाचार असे म्हटले जाते. पण, तरुण नेते  नितीन आता हि घाण नक्कीच साफ करतील यात शंका नाही.
-  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.