Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १६, २०१४

चंद्रपूर समाचारच्या गोडावूनला आग

चंद्रपूर - जटपूरा गेट परिसरातील पंचशिल चौक वार्ड स्थित असलेल्या मराठी दैनिक चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाच्या गोडावूनला रविवारला सकाळी ११.०० वाजताचे सुमारास लागलेल्या भिषण आगीत पेपर रोल, कुलर, फर्निचर सह इतर सामुग्री जळुन भस्म झाले. त्यात सुमारे ५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते.
दै. चंद्रपूर समाचार कार्यालयातील गोडावूनला विद्युत शार्ट सर्किटमुळे आग लागल्याने सकाळी   गोडाऊनमधुन  धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान शेजारच्या    मंडळीने आग विझविण्याचा      प्रयत्न करीत असतांनाच चंद्रपूर  महानगरपालिका येथील अग्नीशयामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्नीशामक दलातील जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. त्यामुळे त्यालगत असलेल्या आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. गोडावूनला लागलेकली आग बरीच वेळ घुमसत राहील्याने आगीत सुमारे ५ लाख रुपयाचे साहित्य जळुन भस्म झाले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नातून आग विझविण्यात आली. सदर घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या दोन तुकड्या अविलंब घटनास्थळी दाखल   झाले. विद्युत शार्ट शर्किटमुळै आग लागल्याचा तर्क जोडला जात असला तरी आग लागल्याचे नेमके कारण काय? याचा शोध शहर पोलिस घेत आहेत.
---------------------------------------------------------------------------
ताडी अड्यावर धाड

दुर्गापूर- येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मागील कित्येक वर्षापासून दुर्गापूर पोलिसांच्या नजरेआड सुरु असलेल्या अवैद्य ताडी अड्यावर आज दि. १६ रोजी पोलिसांनी धाड घालून आरोपी परशुराम राजय्या गोटीपरतीवार वय ३५ वर्षे व सौ. रजनी परशुराम गोटीपरतीवार वय २८ वर्षे राह. आंबेडकर वार्ड क्र. २ दुर्गापूर यांना अटक केली.
आरोपी परशुराम गोटीपरवार हे मुख्य बाजारपेठ असलेल्या व्यापाèयांच्या प्रतिष्ठांना लगत आपला अवैद्य कारभार सुरु केला. याला गावकèयांनी विरोध दर्शविला. पोलिसात तक्रार करण्यात आली.
 त्यांचेवर पोलिसांनी कारवाई देखील केली. मात्र अवैद्य व्यवसायातून प्रचंड प्रमाणात होत असलेली मिळकत यामुळे तो ताडी दुकान बंद न करता उलट बनावट ताडी तयार करुन ग्राहकांना पुरवठा करीत असल्याची गोपनीय माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच धाड टाकुन ताडी व विक्री करण्याचे साहित्य ताब्यात घेतले. आरोपींना अटक करुन त्यांचेवर भांदवीचे कलम ६५ (क) खंड (ड)/८३/८४ मुंबई दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस निरीक्षक ए.आर. ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक घनश्याम कावडे हे करीत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.