Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०९, २०१४

पट्टेदार वाघाच्या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू


चंद्रपूर : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लोहाराजवळच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३९६ मध्ये घडली. मंगला ऊर्फ पूनम गुलाब शेंडे (४३) असे मृत महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहाराला लागून असलेल्या एफडीसीएमच्या जंगलात आज बुधवारी दुपारी दहा महिला सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. लाकडे गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक मंगला शेंडे हिच्यावर हल्ला चढविला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. वाघाने तिला काही अंतरापर्यंत फरकटत नेले. हे दृष्य बघून मंगलासोबत असलेल्या इतर महिला घाबरल्या. त्यांनी लगेच गावाकडे धूम ठोकली व गावकर्‍यांना या घटनेची माहिती दिली. गावकर्‍यांनी घटनास्थळी जाऊन मंगलाचा शोध घेतला असता जंगलातील एका झुडुपात तिचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनाधिकार्‍यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. येथील उपविभागीय वनाधिकारी चौधरी यांनीही या परिसरात पट्टेदार वाघाचे ठसे आढळल्याचे सांगितले. उल्लेखनीय असे की चंद्रपुरातील टॉवर टेकडी परिसरातही काही दिवसांपूर्वी एका बालिकेला बिबट्याने ठार केले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.