Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १७, २०१४

शनिवारीला ‘लिटील चॅम्प्स’ची सुरेल मैफल रंगणार

चंद्रपूर,
सुप्रसिद्ध दूरचित्र वाहिन्यांच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमांतील ‘लिटील चॅम्प्स’ पहिल्यांदाच चंद्रपूर शहरात येत असून, शनिवारी सायंकाळी चांदा क्लब मैदानावर आयोजित ‘चंद्रपूर फेस्टीव्हल १४’ या संगीताच्या सुरेल मैफलीत ते रंग भरणार आहेत. संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या या नि:शुल्क कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुभाष धोटे, तर उद्घाटक म्हणून पालकमंत्री संजय देवतळे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, माजी आमदार रामदास तडस, ज्येष्ठ विधिज्ज्ञ ऍड. रवींद्र भागवत, उपमहापौर संदीप आवारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, मनपा स्थायी समिती सभापती रितेश तिवारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय मराठे प्रभृती उपस्थित राहणार आहेत.
संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ‘लिटील चॅम्प्स’ चा हा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमात मुग्धा वैशंपायन (मुंबई), अजमत हुसैन (जयपूर), बरनाली (भुवनेश्‍वर) व समृध्दी इंगळे (चंद्रपूर) हे लहानगे ‘चॅम्पीयन’ गायन करणार आहेत. त्यांच्या सोबतील नागपूर येथील अनिरुध्द जोशी असणार आहेत. या कार्यक्रमाला लहानमोठ्या सर्वांनीच मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मेंढे, उपाध्यक्ष संजय रामगिरवार, सचिव सुभाष कासनगोट्टूवार तथा सदस्य संजय वैद्य, भारती नेरलवार, ऍड. वर्षा जामदार व मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.