Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २६, २०१३

बिबट जेरबंद

चंद्रपू- शहराच्या सीमावर्ती भागातील टावर टेकडीनजीकच्या वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलानजीक धुमाकूळ घालणारा एक बिबट जेरबंद झाला. बुधवारी पहाटे साडेसहा वाजता ही घटना समोर आली.

वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४८४मध्ये १३ दिवसात बिबट्याने दोन जणांचा बळी घेतला होता. यात अर्चना पितरे या महिलेसह सहा वर्षीय बालिका सरिता मारोती सवरसे हिचा बळी बिबट्याने घेतला होता. या घटनेनंतर भीतीचे वातावरण होते. त्यावर उपाय म्हणून दोन पिंजरे लावण्यात आले होते. जेरबंद झालेला मादी बिबट अडीच वर्षाचा आहे. त्याची रवानगी मोहुर्ली बचाव केंद्रात करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. यानंतरही सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक राव यांनी दिली आहे.
चंद्रपूरपासून ३० किमी अंतरावरील अजयपूरजवळील शेतशिवारात एक बिबट सिमेंट पाइपमध्ये शिरला. मात्र गावकऱ्यांनी गर्दी केल्याने तो घाबरून पाइपमधून बाहेर पडू शकला नाही. वनविभागाने प्रयत्न सुरू केले. मात्र गर्दीमुळे बिबट पाइमध्येच अडकून बसला. अखेर लोकांना बाजूला सारण्यात आले. काही क्षणातच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.