चंद्रपूरच्या कन्यका नागरी बँकेतील अश्लील sms वरून नाहीला कर्मचा-याचे निलंबन व बँक अध्यक्ष - CEO यांनी केलेली शरीर सुखाचे मागणी प्रकरण वेगळ्या वळणावर पोहचले आहे. पोलिसात तक्रार व FIR दाखल झाल्यावरही बँक व्यवस्थापनाने प्रकरणात कुठलीही दखल न घेतल्याने संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बँक अध्यक्षाला चोप देत त्याच्यावर शाई टाकली. आज या समस्येसंदर्भात मनसेच्या महीला आघाडी कार्यकर्त्यांनी बँक व्यवस्थापनाची भेट घेतली. यात चर्चा सुरु असताना वाद चिघळला. बँक अध्यक्षांनी याप्रकरणी ताठर भूमिका घेतली. वाद वाढत गेला यात सर्वप्रथम मनसेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्करवार यांना चोप दिला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शरीर सुखाची मागणी करण्याचे गुन्हे दाखल असलेल्या अध्यक्षांवर शाई टाकली. हा प्रकार सुरु असताना बँकेचे संचालक व इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता. घटना घडल्यावर मनसे कार्यकर्ते बँकेतून निघून गेले. बँकेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचा तपास चालविला आहे. पिडीत कर्मचा-याला अज्ञात मोबाईलवरून अश्लील sms येत असताना बँकेने तिलाच निलंबित केले वर प्रकरण निस्तरण्यासाठी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. ही ऑफर नाकारणा-या पिडीतेलाच थेट बडतर्फ केले. या प्रकरणावरून चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण तापले असताना मनसे कार्यकर्त्यांनी उचललेले पाउल खळबळ उडविणारे ठरले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, डिसेंबर ३१, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments