Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २३, २०१३

इंदिराजींचा जीवनपट सांगणारा प्रियदर्शिनी चौक

देवनाथ गंडाटे 
चंद्रपूर, ता. २२ : बसगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी वाहकाला पाण्याच्या टाकीजवळ थांबवा, असे सांगतात. गेली अनेक वर्षे पाण्याच्या टाकीमुळे प्रसिद्ध झालेला हा प्रियदर्शिनी चौक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवनपट सांगतोय. सांस्कृतिक सभागृह, मुख्य डाकघर, बसथांब्यामुळे हा चौक नेहमीच गर्दीने ङ्कुललेला असतो.

शहरातून नागपूर, मूलकडे जाताना जटपुरा गेट ते बसस्थानक मार्गावर असणारा हा प्रियदर्शिनी चौक. शहरात पाणीपुरवठा योजना आली, तेव्हा इथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. तेव्हापासून या चौकाची पाण्याची टाकी चौक अशी ओळख झाली. पूर्वी इथे पथकर नाका होता. दुर्गापूर, सिनाळा, भटाळी, चिचपल्ली येथून भाजीपाला विक्रीसाठी येणारे विक्रेते या नाक्यावर शुल्क भरून पावती घेत असत. पूर्वी या भागात केवळ बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मुख्य डाकघर होते. याच परिसरात हवेली हॉटेल होते. ते त्याकाळी प्रसिद्ध होते. काही काळाने हॉटेल गेले. पण, त्याजागी आज हवेली कॉम्प्लेक्स उभे झाले. पेट्रोलपंप, मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखासुद्धा या चौकात होती. मागील काही वर्षांपूर्वी या चौकात माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांचा पुतळा साकारण्यात आला. त्याचे भूमिपूजन १८ ङ्केब्रुवारी १९८७ मध्ये झाले. पुतळ्याची स्थापना झाल्यानंतर तिथे सौंदर्यीकरण करण्यात आले. २००१ मध्ये शेजारीच इंदिराजींच्या नावे सांस्कृतिक सभागृहाची स्थापना करण्यात आली. समोरचा परिसर सौंदर्यीकरण करून त्यांचा राजकीय जीवनपट दाखविण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर बैलगाडीच्या चाकाची रचना करण्यात आली आहे. ती भारतीय शेतकèयांचे प्रतीक असून, इंदिराजींचे शेतकèयांवरील प्रेम दर्शविते. षटकोनी आकाराच्या ६७ ङ्करशा लावण्यात आल्या आहेत. त्या इंदिराजींच्या ६७ वर्षांच्या जीवनकाळातील आठवणी करून देतात. त्यातील लाल रंग लाल किल्ला, तर हिरवा रंग देशाच्या समृद्धीचे प्रतीक आहे. ङ्कुलझाडांच्या कुंड्यांनी परिसर सजविण्यात आला असून, त्यात इंदिराजींच्या २० कलमी कार्यक्रमाची आठवण करून देते. येथे अशोकाची वृक्षे आहेत. महान सम्राट अशोकाच्या समृद्ध कार्यकाळाचे प्रतीक म्हणून ते लावण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी पुतळ्यावर दोन वीजदिव्यांचा प्रकाश पडतो. त्यातून महात्मा गांधीजींची प्रेरणा आणि पंडित नेहरूंचे मार्गदर्शक म्हणून स्थान दर्शविते. चबुतèयावर २० आडव्या पट्ट्या आहेत. या श्वेत रंगाच्या पट्ट्या २० वर्षांच्या राजकीय जीवनाचे द्योतक आहेत. चबुतèयावर दाखविण्यात आलेले स्मृतिचिन्ह इंदिराजींच्या प्रमुख घटना सांगतात. यात आशियाड, सातवी अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षस्थान, राष्ट्रीय एकता, विश्वशांती, बालवीर चक्र पुरस्कार, राष्ट्रकुल शिखर परिषद या घटनांचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.