Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१३

बदलत्या शहराचा साक्षीदार गांधी चौक

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर, ता. १७ : राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, महानगरपालिका, गोलबाजार, पोलिस ठाणे, सराङ्का बाजार आणि शतकानुशतके विविध घडामोडींचा केंद्रqबदू राहिलेला गांधी चौक बदलत्या शहराचा साक्षीदार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या चौकाला गांधीजींचे नाव देण्यात आले.

१९ मे १८६७ ला येथे नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर या शहराच्या विकासाला प्रारंभ झाला. आता मागील दोन वर्षांपासून शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. सातमजली इमारत आणि पुगलिया गल्ली ही या चौकाची आणखी एक ओळख. शेजारी नेताजीनगर भवन, शहर पोलिस ठाणे आहे. पूर्वी तिथे कोतवाली भरायची. त्यातूनच पालिकेचा कारभार सुरू झाला होता. पुढे पालिकेची इमारत व टाऊन हॉल बनविण्यात आले. आता पालिकेची जुनी भव्य इमारत पाडून नवीन संकुल उभारण्यात येत आहे.

गांधी चौकातच गोल बाजार, सराङ्का बाजार, कापड मार्केट, अपना बाजार असल्यामुळे येथे दिवसभर गर्दी असते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात माळी समाज भाजीपाला पिकवायचे आणि तेली समाज तेलाचे घाणे चालवून किराणा व व्यापारपेठ चालवीत असत. त्यामुळे तेव्हाच्या चांद्याचा भाजीपाला आणि तेलघाणा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होता. आता सर्व बदलले आहे. गोलबाजारातील भाजीपाला आणि किराणा दुकाने आता विविध समाजाचे लोक चालवीत आहेत. शिवाय व्यापार qहदी भाषिकांच्या हाती आला आहे.

गांधी चौकातील वर्दळ पहाटेपासूनच सुरू होते. सकाळी ङ्किरायला जाणारे नागरिक गांधी चौकातूनच जातात. ङ्किरून आल्यानंतर अनेक समवयस्क नागरिक गांधी चौकात चर्चा करीत असतात. त्यामुळे येथे पहाटेपासूनच चहा आणि ओलूपोह्याची विक्री जोरात होते. सकाळी आठ वाजल्यानंतर हे विक्रेते निघून जातात. त्यानंतर भाजीपाला, ङ्कळविक्रेते बाजारात येऊन बसतात. मग, वर्दळ सुरू होते ती रात्री नऊवाजेपर्यंत कायम असते.

येथील पुगलिया गल्लीत घडणाèया घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होतो. येथे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे निवास, कार्यालय, काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. स्वातंत्र्यानंतर पुगलिया घराण्याचे राजकारणात महत्त्वाचे योगदान राहिले. त्यामुळे पुगलिया गल्लीतील घडामोडींवर अन्य राजकारण्यांसह प्रसिद्धी माध्यमांचे विशेष लक्ष असते. याच गांधी चौकाच्या शेजारी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे जन्मस्थळ आहे. पोटदुखे घराण्याचेदेखील राजकारण आणि समाजकारणात मोठे योगदान असल्याने गांधी चौकाने अनेक महत्त्वपूर्व घटनांची साक्ष देते. पूर्वीच्या नगरपालिकेच्या इमारतीशेजारी मैदान होते. त्यामुळे विविध राजकीय पक्षाच्या जाहीर सभा येथे व्हायच्या. येथे शत्रुघ्न सिन्हा, सुशीलकुमार qशदे, विलासराव देशमुख यांच्यासह विविध कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.