Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१३

जंगल विदर्भात; फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात!


चंद्रपूर- संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जंगल चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. येथील जंगलव्याप्त परिसरामुळे अनेक प्रकल्प आजही रखडले आहेत. परिणामी, या दोन्ही जिल्ह्य़ाचा पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही. फॉरेस्ट लॅण्डच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते वैदर्भियांच्या तोंडाला पाने पुसतात आणि आता फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात स्थापनेची घोषणा करून शासनाने विदर्भावर आणखी एक अन्याय केला आहे. असा आरोप र्शमिक एल्गार संघटनेच्या सर्वेसर्वा अँड. पारोमिता गोस्वामी यांनी आज बुधवार (२७ नोव्हेंबर) ला पत्रपरिषदेत केला.
यावेळी र्शमिक एल्गारच्या विजय सिद्धावार, प्रवीण चिचघरे, छाया सिडाम, संगीता गेडाम, गजानन सिडाम, लहू आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अँड. गोस्वामी म्हणाल्या, केंद्र शासनद्वारा संचालित देशातील महत्त्वाची ठरणारी चौथी फॉरेस्ट अँकेडमी सांगली जिल्ह्य़ात होत आहे. यापूर्वी शासनाने कोईंबतूर, देहरादून, हैद्राबाद येथे फॉरेस्ट अकॅडमीची स्थापना केली. आणि आता पहिल्यांदाच महाराष्ट्रात चौथी अकॅडमी होणार आहे.
असे असताना मात्र विदर्भातील लोकप्रतिनिधी गप्प बसले आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा विचार केल्यास सर्वाधिक जंगलव्याप्त परिसर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात ७0.0४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्य़ात ३५.६४ टक्के, गोंदिया जिल्ह्य़ात ३५.0८ टक्के, नागपूर जिल्ह्य़ात २0.४५ टक्के, अमरावतीत २६.१0 टक्के वनजमीन आहे. विदर्भातील हे जिल्हे वनसंपदेने समृद्ध असताना केवळ १.६८ टक्के जंगल असणार्‍या सांगली जिल्ह्य़ात फॉरेस्ट अँकेडमी स्थापन करणे, कितपत योग्य असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शासनाला फॉरेस्ट अँकेडमी स्थापन करावयाची असेल तर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा विचार करावा, असेही त्या म्हणाल्या. चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, देशाच्या तुलनेत वाघाच्या संख्येत झालेली तुलनात्मक वाढ, देशासाठी गौरवाची बाब आहे. याच जिल्ह्य़ातील वरोरा भागात माळढोक हे दुर्मिळ पक्षी आढळून आले. शिवाय देशातील एकमेव साग संशोधन केंद्र येथेच असून ७0 हेक्टरवर वनराजिक महाविद्यालय असण्याचा मान याच जिल्ह्य़ाला दिला जातो. १९८८-९0 या कालावधीत वनपरिक्षेत्राधिकारी यांचे एका तुकडीचे प्रशिक्षण झाल्यानंतर हे प्रशिक्षण केंद्र राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आले. फॉरेस्ट अँकेडमीसाठी तयार संसाधन चंद्रपूर जिल्ह्य़ात असताना सांगली येथे अँकेडमी करणे ही बाब जिल्ह्य़ावरच नव्हे तर विदर्भावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे शासनाने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ातील वनवैभवाचा विचार करून याच जिल्ह्य़ात फॉरेस्ट अँकेडमी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून विदर्भातील आमदार, खासदारांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. फॉरेस्ट अँकेडमीसाठी होणारी गुंतवणूक १00 कोटींच्या आसपास असणार आहे. शिवाय यासाठी आवश्यक असलेली ११ हेक्टर जमीन शासनाला सहज मिळू शकते. परिणामी, जिल्ह्य़ात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळेही फॉरेस्ट अँकेडमी येथेच करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.