Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २०, २०१३

तीन महिन्यानंतरही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

मुंबई - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या हत्येला बुधवारी तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट फिरत असून, पोलिसांना त्यांना पकडता आलेले नाही.

मारेक-यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ३४ पथके स्थापना केली आहेत मात्र माहिती आणि संशयितांव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती विशेष काही लागलेले नाही. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील अडीज हजार पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे. मात्र अजूनपर्यंत ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलिस फक्त वेगवेगळे अंदाज काढत आहेत.
           तीन महिन्यांपूर्वी २० ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर सकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात मारेक-यांनी डॉ. दाभोलकरांची गोळी झाडून हत्या केली होती.पोलिसांनी दाभोलकर यांच्यावर हल्ला झालेल्या परिसरातील १६९ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यापैकी ११७ ठिकाणचे फुटेज तपासण्यात आले. अस्पष्ट फुटेज लंडन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले मात्र त्यातूनही पोलिसांना काहीही मिळाले नाही.
          पोलिसांची काही पथके गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये आरोपींचा शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगार, सुपारी किलर, बेकायदा शस्त्रास्त्र विक्री करणारे याची चौकशी सुरु आहे. मात्र अजूनही पोलिसांना मारेक-यांपर्यंत पोहोचता आलेले नाही. पुणे पोलिसांना या तपासत मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, एटीएस, सीआयडी मदत करत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.