Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २७, २०१३

मोदीच्या सभेपूर्वी बॉम्बस्फोट

पाटण्यात सात साखळी स्फोट, 5 ठार, 50 जखमी

नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी रविवारी पाटणा बॉम्ब स्फोटांच्या मालिकेने हादरले. पाटण्यात एकूण आठ स्फोट झाले दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी रविवारी पाटणा शहर बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरले.गांधी मैदान परिसरात सहा आणि पाटणा रेल्वे स्टेशनजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. दोन बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. हे सर्व स्फोट कमी तीव्रतेचे होते. या स्फोट मालिकेत ५ मृत्यू असून, ५० जण जखमी झाले आहेत.
सभेपूर्वी गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये घबराट पसरवण्यासाठी हे स्फोट घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
या स्फोटामागे स्थानिक गुन्हेगारी टोळया असाव्यात असा अंदाज गुप्तचर खात्याने वर्तवला आहे.  पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर दहावर रविवारी सकाळी पहिला स्फोट झाला त्यानंतर एलफिन्स्टन चित्रपटगृहाजवळ दुसरा स्फोट झाला.
नरेंद्र मोदींच्या सभास्थळापासून १५० मीटर अंतरावर दुसरा स्फोट झाला. बि्हारचे पोलिस प्रमुख अभयानंद यांनी दुसरा स्फोट झाल्याची पुष्टी केली. पहिला गावठी बॉम्बचा स्फोट होता मात्र दुसरा स्फोट गावठी बॉम्बचा नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरा स्फोट झाडाखाली झाला.
उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी काही लोक येथे विश्रांती घेत होते त्यावेळी हा स्फोट झाला. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन गावठी बॉम्बपैकी एकाचा स्फोट झाला दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला.   
पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर दहावर रविवारी सकाळी एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या काहीतास आधी हा बॉम्बस्फोट झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्लॅटफॉर्मवर फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याने मोठी जिवतहानी टळली असे एसएसपी मनू महाराज यांनी सांगितले. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये रविवारी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपने मोठया प्रमाणावर व्यवस्था केली आहे. या सभेसाठी लोकांना रेल्वेने आणले जात आहे. प्लॅटफॉर्मवरील शौचालयात स्फोट झाल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.