Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०१, २०१३

वीजकेंद्राच्या राखेत घातक युरेनियम, थोरियमचे अस्तित्व

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातून निघणाऱ्या राखेत मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या युरेनियम आणि थोरियमचे अस्तित्व आहे.
चंद्रपूर वीजकेंद्रातील राखेच्या नमुन्यांचा अभ्यास "नॅशनल जिऑफिजिक रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद' येथे डॉ. राजीव मेनन, नागपूर येथील नॅशनल ब्युरो ऑफ साईल सर्वे येथील पी. राजा, के. एस. व्ही. सुब्रमह्यण्यम या वैज्ञानिकांनी 2012 साली केला.
त्यांनी चंद्रपूर वीज केंद्रातील इलेक्‍ट्रोस्टेटिक प्रेसिपिटेटर तसेच इकोनोमायझर परिसरातील राखेचे नमुने गोळा केले. त्यातील घटकांच्या परीक्षणामध्ये रेडीओधर्मी युरेनियम (u238),थोरीयम (Th232) ही मुलद्रव्येही सापडलेली आहेत. यांच्या अभ्यासातून एक मेट्रिक टन कोळसा जाळल्यानंतर निघणाऱ्या राखेत 4.3 मायक्रोक्‍युरी रेडिएशन असल्याचे त्यांनी अभ्यासाअंती सांगितले आहे. या अभ्यासकांच्या मते हे रेडिएशन चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्राच्या राखेच्या तलावातील पाण्यात तसेच पाण्याच्या लिचिंगमुळे खालच्या भूगर्भातही पसरलेले आहे. सोबतच परिसरातील पाणीही प्रदूषित झाले आहे. या अभ्यासकांच्या मते या राखेतील प्रदूषित तत्त्व श्‍वसनाद्वारे परिसरातील अन्न खाल्ल्याने अन्न शृंखलेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. जास्त काळापर्यंत असे होत असल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने ही राख तलावात साठवून ठेवू नये, दुसऱ्या पद्धतीने वापर करावा, असे शास्त्रज्ञांनी सुचविले आहे.
चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीजकेंद्र तसेच विविध कारखाने यातून निघणारे वायू, पाणी, हवा यातील फक्त सहा पॅरामीटर्सचा अभ्यास करते. याच आधारावर चंद्रपूर हे देशातील चवथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड नवी दिल्ली यांनी 2006 व 2010 ला स्पष्ट केले आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूर परिसरात 1100 ते 1500 लोक मृत्युमुखी पडतात, असे ग्रीन पीस या संस्थेने त्यांच्या "कोल किल्स' या 2012 च्या अहवालात स्पष्ट केले आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
Chandrapur thermal plant spews radioactive fly ash
chandrapur : Fly ash generated by a super thermal plant in eastern Maharashtra’s  Chandrapur district has radioactive elements that could cause severe environmental and human health problems, says a new study.  Rajeev Menon of the Hyderabad-based National Geophysical Research Institute and fellow scientists from the Nagpur-based National Bureau of Soil Survey and Land Use Planning and RTM Nagpur University had sometime ago conducted the study. Their report ‘Radioelemental characterization of fly ash from Chandrapur Super Thermal. Power Station (CSTPS)’ was published in the latest issue of science journal ‘Current Science’. The basis of Menon and his team’s study was the natural radioactivity of the fly ash generated by the 2345MW (four units of 210MW each and three of 500MW each) CSTPS due to the presence of potassium, uranium and thorium. CSTPS is the biggest pit head thermal power station run by the Maharashtra State Power General Company Ltd.
“Natural radioactivity was measured in fly ash samples collected from economizer, aerator and electrostatic precipitator (EP) of CSTPS using a gamma ray spectrometer. The study indicates an elevated concentration of radio-nuclides, especially in the finer ash samples from electrostatic precipitator (EP), which may provide an exposure pathway through inhalation of airborne ashes and could probably cause severe environmental and human health problems,” said the report. The study is significant as it provides the requisite basic data on the radio-nuclides concentration in fly ash from CSTPS for a detailed follow up of environmental monitoring and for formulating effective management strategies.  “Caution should be exercised in dumping the fly ash and essential preemptive steps should be taken prior to the alarming increase in concentration of radio-nuclides in fly ash, which will have irrevocable and disastrous effects on the fragile ecology and environment,” the study concluded.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.