Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ११, २०१३

१0२ गुन्हेगार तडीपार

चंद्रपूर: गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी चंद्रपूर शहर पोलीस व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १0२ गुन्हेगारांना ९ ते १८ सप्टेंबर या कालावधीकरिता तडीपार केले. मात्र हा आदेश झुगारून शहरात वास्तव्य करणार्‍या सात जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोळा, गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहर पोलिसांनी एकापेक्षा अधिक गंभीर गुन्हे करणार्‍या ५५ आरोपींची यादी तयार केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ यांनी या सर्वांना १८ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर शहरातून तडीपार केले. त्यात गणपत बुजोणे, रमेशउर्फ पिल्या पोचम गोवर्धन, मनोज गव्हारे, राकेश पडोळे, धिरज सागेवार, मनोज मेश्राम, क्रिष्णा दुर्गे, रमेशउडतावार, शंकर मडकाम, संतोषदिकोंडावार, गणेश आत्राम, प्रितम वाळके, धिरज टेकाम, राजू कांबळे, कैलास गड्डीवार, मल्लूबाई दुर्गे, लिला दुर्योधन, शंकर चिलमिल, दशरथ मलैय्या दौडी, सुनंदा वासेकर, प्रविण मसराम, मिना गेडाम, छोटू सुलेमान खान पठाण, भिमराव कोटावार, नरसिंग रेवेल्लीवार, सुशिला ठाकरे, राजा चकनलवार, सुधाकर चंदगिरीवार, निरू चुनारकर, अरविंद बागडे, कवडू गेडाम, बबलू जंगम, शिरीषठाकरे, सैय्यद अब्बास सैय्यद हुसेन, माया बंदलवार, रंजित कोटावार, ललिता शेरकुवार, शंकर आत्राम, रविंद्र मोहुर्ले, प्रकाश चाफले, शंकर अलोणे, विजय उराडे, मालन शेंडे, संतू जव्हेरी कश्यप, धनराज रंगारी, श्याम कावेरी, राजुबाई गेडाम, त्रिशला बुटले, मुरलीधर रामटेके, शेख हुसेन शेख महंमद, रमेश मोटमवार, सुमन मोटमवार, माला बिटूरवार, अशोक दहागावकर यांचा समावेश आहे.
तडीपारीचा आदेश देऊनही यांपैकी धिरज सागेवार, अशोक दहागावकर, कैलास गड्डीवार, राजू कांबळे, भिमराव कोटावार, रंजीत कोटावार, रंजीत कोटावार व रमेश उडतावार या सात जणांनी आदेशाची अवहेलना करीत शहरातच वास्तव्य केले. ही बाब लक्षात येताच, शहर पोलिसांनी या सर्वांना अटक केली.
यासोबतच रामनगर पोलीस ठाण्यानी ४७ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली.  बल्लारपूर पोलीस ठाण्यानीसुद्धा ६४ गुन्हेगारांना २३ सप्टेंबरपर्यंत शहरातून तडीपार केले. या आदेशानुसार तडीपार गुन्हेगारांपैकी शहरात कुणी आढळल्यास नागरिकांनी याबाबत पोलिसांना सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.