Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०४, २०१३

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

चंद्रपुरात पालकमंत्र्यांना हिसका
चंद्रपूर दि ०४(प्रतिनिधी):
अतिवृष्टीमुळे ङ्कहाय अ‍ॅलर्टङ्कचा इशारा देण्यात आलेल्या चंद्रपूरमधील जनतेच्या मनात निष्काळजी सरकारबद्दल खदखदणा-या असंतोषाचा फटका आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांना बसला. चंद्रपुरातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या देवतळे यांच्या ताफ्यावर दगडफेक करून नागरिकांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
गेला आठवडाभर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं कहर केला आहे. जराही न थांबता कोसळणा-या पवासामुळे बुलडाणा, अकोला, यवतमाळ, गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेच, पण चंद्रपूरमध्ये तर प्रशासनानं ङ्कव्हेरी हाय अ‍ॅलर्टङ्कचा इशारा दिलाय. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, गोसेखुर्द आणि इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं तिथली परिस्थिती भीषण झाली आहे. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय.
या पाश्र्वभूमीवर, संजय देवतळे आज स्थानिक अधिका-यांसोबत चंद्रपुरात पूरपरिस्थितीची पाहणी करायला पोहोचले. पुराचा फटका बसलेल्या काही कुटुंबांची त्यांनी आस्थेनं चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी आधीच मदत जाहीर केलेली असल्यानं त्यांचा हा दौरा तसा औपचारिकच होता. परंतु, चंद्रपूरवासियांनी त्याला भलतंच वळण दिलं.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अद्याप गरजूंपर्यंत पोहोचलीच नसल्यानं नागरिक खवळले होते. तो सगळा राग त्यांनी संजय देवतळेंवर काढला. संतप्त जमावानं मंत्रिमहोदयांच्या ताफ्यावर दगडफेक करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. चंद्रपुरात पूर येऊन पाच दिवस झाले, मग इतके दिवस पालकमंत्री कुठे होते?, असा सवालही नागरिक करत होते. त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. त्यानंतर, लवकरात लवकर मदत देऊ, एवढं आश्वासन देऊन देवतळेही माघारी फिरले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.