बल्लारपूर: येथील वनविकास महामंडळाच्या डेपोतून चोरी केलेले लाकूड बल्लारपूर पोलिसांनी काल (दि. २५ ) रात्री बसस्थानक परिसरात पकडले. या लाकडाची किंमत ४६ हजार ११२ रुपये असल्याचे सांगण्यात येते. चोरीच्या आरोपात तिघांना अटक केली असून त्यांची नावे सूरज किशोर आवळे, विजयराज कांबळे (दोघेही रा.मौलाना आजाद वार्ड, बल्लारपूर) आणि संजय गुड्ड शिवपाल सिंह गौर (रा. लालपेठ कालरी चंद्रपूर) अशी आहेत. या तिघांनी मिळून येथील वनविकास महामंडळाच्या डेपोत असलेले लाकूड दोन दिवसांपूर्वी चोरले आणि ते चंद्रपूरला नेऊन त्याची कटाई केली. कटाई केलेले लाकूड टेम्पोने बल्लारपूरला आणत असताना नाकाबंदीवर असलेले वाहतूक निरीक्षक नामदेव काळे व त्यांचे सहकारी आर.आर. ठाकूर, जनार्दन ठाकूर यांनी टेम्पोला (एम.एच.३४ एबी ५७५५) पकडले. टेम्पो आणि लाकूड असा दोन लाख किंमतीचा माल जप्त केला आहे. वनविकास महामंडळाच्या अधिकार्यांना डेपोतून लाकूड चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात आज तक्रार केली. यावरुन या तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी करीत आहेत. |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments

