Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २२, २०१३

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सुरळीत

चंद्रपूर- गोंदियाहून वडशाला जात असलेल्याचांदा फोर्ट पॅसेंजरचे इंजिनसह नऊ डबे रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान वडशाच्या अलीकडे १५ कि.मी. अंतरावर घसरले. ही पॅसेंजर गोंदियाहून दोन तास उशिरा सुटली होती. वडशाजवळ पोहोचत असताना ती रुळावरून घसरली. रूळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे रूळ सुरळीत झाला असून, गाडी सुरु झाली आहे. 
इंजिन रुळावरून घसरल्यानंतर ते फरफटत ४०० मीटर अंतरावरील शेतात झाडाला जाऊन अडकले. हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे नक्षल्यांनी रुळांची तोडफोड केल्याची शंका व्यक्त होत आहे. इंजिनसह नऊ डबे रुळावरून घसरल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अंधारामुळे रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे मदतकार्य सुरू झाले नव्हते. मध्यरात्रीनंतर रेल्वेचे एक पथक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत वडशातील ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून मदत केली. या पॅसेंजरमधून उतरलेल्या प्रवाशांची व्यवस्था वडसा येथील एका भवनात करण्यात आली आहे. ही रेल्वे गोंदियाहून निघाली असता वडशाजवळ दुर्घटना घडली, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे व्यवस्थापक एस.एल. वर्मा यांनी सांगितले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम.एस. हक म्हणाले की, अपघात झालेले स्थळ नक्षलग्रस्त भागात असल्याने तेथे गोंदिया आणि गडचिरोलीतून पोलीस दल पाठविण्यात आले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.