रक्तदात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
चंद्रपूर दि.21- रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करुन ही चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. राज्य रक्तसंक्रमन परिषद मुंबई व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वैच्छिक रक्तदात्यांचा सत्कार समारंभ स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.प्रमोद सोनुने, डॉ.टि.जी.धोटे, डॉ.अनंत हजारे, नंदू नागरकर, श्रीमती सुनिता लोढीया, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, सत्यनारायण तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्री संजय देवतळे यांनी दीप प्रज्वलन करुन उदघाटन केले. यावेळी बोलतांना देवतळे पुढे म्हणाले की अनेक सामाजिक संस्था व नागरीक स्वेच्छेने रक्तदान करतात. या रक्तदानामुळे असंख्य नागरीकांचा जीव वाचविण्यास मदत होते. रक्तदान ही चळवळ असून यात अनेकांनी स्वेच्छेने सहभागी होण्याची गरज आहे. आजचा सत्कार हा रक्तदान करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी असून या कार्यकर्त्यांनी रक्तदान चळवळ अनेक लोकापर्यंत पोहचवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते जिल्हयातील संस्था व रक्तदाते यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद सोनुने यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हयातील असंख्य संस्था व रक्तदाते मोठया संख्येने उपस्थित होते.