चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२) हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांसह ते राजस्थान दौ-यावर गेले होते. शुक्रवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना जयपूर येथील एका रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घेतली. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी जिल्हा परिषद सदस्य चित्रा डांगे व दोन्ही मुल उपस्थित होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव येथे येण्याची शक्यता आहे.
वीजनिर्मिती कंपनीत नोकरीवर असलेले डांगे यांनी शिवसेनेच्या सामान्य कार्यकत्र्यांपासून आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला सेनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावणाèया श्री. डांगे यांनी नंतर शिवसेनेकडून वरोरा-भद्रावती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली होती. या निवडणुकीतील पराभवानंतर ते काही वर्षे राजकारणापासून दूर होते. त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.