गडचिरोली- मागील वर्षभरापासून नक्षल्यांची कंबर मोडणाèया गडचिरोली पोलिसांना आणखी एक मोठं यश मिळालं आहे. तब्बल २८ नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या घटनेमुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून, दुसरीकडे पोलिसांचं मनोधैर्य उंचावलं आहे. गडचिरोली पोलिस मुख्यालयात आज झालेल्या एका कार्यक्रमात या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं. याचवेळी एका नक्षल जोडप्याचा विवाह पार पडला.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये परिवर्तन यात्रेवर अमानूष हल्ला चढवणाèया नक्षलवाद्यांना गडचिरोलीतील एका घटनेनं मोठा हादरा दिला. ही घटना म्हणजे २८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गडचिरोली पोलिसांनी मागील तीन महिन्यांपासून नक्षल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेण्याचा अनोखा उपक्रमहाती घेतला. नवजीवन योजना असं या उपक्रमाचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून नक्षल्यांच्या घरोघरी जाऊन कुटुंबीयांना नक्षल चळवळीचे धोके आणि शासनाच्या मदतीचे स्वरुप पोलिसांनी समजावून सांगितले. त्यामुळं कुटुंबीयांनी चळवळीतील मुला-मुलींचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आलं. त्यामुळंच आज २८ युवा नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. या २८ जणांत ८ महिला आणि २० पुरुष आहेत. या सर्वांना त्यांच्या हुद्यानुसार बक्षीसाची रक्कम देण्यात आली. कमांडरला एक लाख तर दलम सदस्यांना ७५ हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. सोबतच नक्षल्यांच्या कुटुंबीयांनाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला नागपूर क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अनुपकुमार qसह, नक्षल सेलचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये अनेक जण मोठ्या कारवायांमध्ये सहभागी होते. मरकेगाव हत्याकांड, पुस्टोला बॉम्बस्ङ्कोट,हत्तीगोटा चकमक अशा हादरवणाèया कारवायात सहभागी या नक्षल्यांनी चळवळीत जाऊन भ्रमनिरास झाल्याचं सांगितलं. अनेकदा जबरदस्तीनं तर काहीवेळा पोलिसांची भीती दाखवून चळवळीत सहभागी करून घेतल्याचे अनुभव या नक्षल्यांनी सांगितले.
एकाचवेळी २८ नक्षल्यांनी आत्मसमर्पण करणं, हे गडचिरोली पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. मात्र, आता या नक्षल्यांच्या पुनर्वसनाचं काम तेवढ्याचं तळमळीनं झालं तरंच त्याचा प्रभाव पडू शकेल. पण सध्या तरी त्यांना काय ङ्कायदे मिळणार आहेत, याची कोणतीही माहिती नसल्यानं हे नक्षली संभ्रमात आहेत. यासंदर्भात विचारणा केल्यावर आत्मसमर्पण योजनेचे सर्व ङ्कायदे त्यांना मिळतील आणि लवकर मिळतील, असं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी एका नक्षल जोडप्याचा विवाह पोलिसांच्या पुढाकारानं विधिवत लावून देण्यात आला. या मंगल सोहळ्याला गडचिरोली शहरातील गणमान्य, आत्मसमर्पित नक्षल्यांचे नातेवाईक आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.