Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ३०, २०१३

पुरस्कारांसाठी पत्रकारांकडून प्रवेशिका आमंत्रित

श्रमिक पत्रकार संघातर्फे स्पर्धा : एक ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

चंद्रपूर  : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा आणि वृत्तछायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

दरवर्षी एक ऑगस्ट रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यात स्व. छगनलाल खजांची स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल. लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठा तर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असून पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील. इतिहास अभ्यासक अशोकसह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख एक हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी एक एङ्क्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल, लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरित नसावे. स्पर्धा मराठी, qहद, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मुळ प्रतीसह चार छायांकित प्रतीत असावे. मुळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. यापूर्वी दोनदा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांनी त्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवू नये. सर्व प्रवेशिका १५ जुलै पर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब जुना वरोरा नाका चंद्रपूर या पत्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, प्रशांत देवतळे, सुशील नगराळे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.