Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १०, २०१३

बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार


चंद्रपूर- दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा आज चंद्रपुरातील त्याच लालपेठ परिसरात बिबट्यानं पुन्हा एका व्यक्तीचा बळी घेतला. याही व्यक्तीचा एक हात पूर्णपणे बिबट्यानं तोडला आहे. मात्र, हा मृत्यू जंगली श्वापदामुळं झाला की अन्य कुण्या कारणानं, याचा शोध वनविभाग घेत आहे. बिबट्या qकवा वाघाच्या हल्ल्यात या इसमाचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असलं, तरी वनविभाग त्यावर ठाम नाही. मात्र, या दोन घटनांमुळं लोकांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
मागील दीड महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील बाह्य भाग असलेल्या लालपेठ इथं एका अनोळखी महिलेला बिबट्यानं ठार केलं होतं. आज याच परिसरात राजू अलकंटीवार या युवकाचा मृत्यू झाला. तो मजूर होता. लालपेठ इथल्या घरी अंगणात रात्री खाटेवर तो झोपला असतानाच त्याला ङ्करङ्कटत झुडपात नेऊन त्याला ठार करण्यात आल्याचं घटनास्थळावर दिसून आलं. अशाप्रकारचा मृतदेह वन्यप्राण्यांनी खाल्ल्यावरच दिसून येतो. मृतदेहापासून एक हात तोडण्यात आला असून, छातीजवळचं मांस खाल्लेल आहे. असाच मृतदेह दोन दिवसांपूर्वी अनोळखी महिलेचा सापडला होता. यामुळं बिबट्या qकवा वाघानंच ही हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, वनविभागाचे अधिकारी यावर द्विधास्थितीत आहेत. राजूचा मृत्यू वन्यजीवाच्या हल्ल्यात झाला की अन्य कोणत्या कारणानं झाला, याचा तपास केल्यावरच भूमिका घेतली जाईल आणि तशी मदत दिली जाणार आहे.
राजू अलकंटीवार हा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मागील दीड महिन्यात ठार झालेला दहावा व्यक्ती आहे. त्यामुळं सर्वत्र असंतोष पसरला आहे. दोन दिवसांच्या अंतरानं त्याच भागात पुन्हा ही घटना घडल्यानं लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. हा असंतोष वनविभागाच्या अधिकाèयांसमोर लोकांनी व्यक्त केला. पण पोलिस मदतीला असल्यानं अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेवर पोलिस विभागानं हा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय व्यक्त करून शवविच्छेदन अहवालानंतरच प्रकरण स्पष्ट होईल, अस राजीव पवारसहाय्यक वनसंरक्षकचंद्रपूर सांगितलं.
 लालपेठ परिसरात मागीलवर्षीही बिबट्यानं असाच धुमाकूळ घातला होता. मात्र, त्यानंतर कोणत्याच उपाययोजना वनविभागानं केलेल्या नाहीत. जुनोना जंगल लागून असताना तेथील जंगली श्वापद या परिसरात येतात, हे माहित असूनही प्रतिबंधात्मक उपाय न केल्यानंच या लागोपाठ दोन जीवांचा बळी गेल्याचं दिसत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.