महापौर अमृतकर : मुंबईनंतर चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रयोग
चंद्रपूर, ता. ३ : सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतून बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून भानापेठ येथील पंडित नेहरू प्राथमिक शाळा आणि राजे धर्मराव प्राथमिक शाळेमध्ये आधार केंद्र तयार करण्यात येत असल्याची माहिती महापौर संगीता अमृतकर यांनी दिली. सध्या या इमारतीत इन्टेरिअर आणि ङ्कर्निचर बसविण्याचे काम सुरू असून, लवकरच महिलांची बाजारपेठ येथे सुरू होईल.
चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांसाठी राबविण्यात येते. शहरात १२ हजार १९ कुटुंबांतील ५३ हजार ७२३ नागरिकांचा दारिद्य्ररेषेखालील यादीत समावेश आहे. या योजनेतून गरिबांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. शहरी स्वयंरोजगार कार्यक्रमातून महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाखांपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज देण्यात येते. कर्जावरील रकमेच्या २५ टक्के qकवा जास्तीत जास्त ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. २०१२-१३ या आर्थिक वर्षात ९३ लाभाथ्र्यांना एक कोटी सात लाखांचा निधी विविध व्यवसायांकरिता देण्यात आला आहे. शहरी महिला स्वयंसहायता कार्यक्रमातून महिला बचतगटांना नऊ लाखापर्यंत कर्ज आणि तीन लाखापर्यंत अनुदान मिळते. यात चालू वर्षात ६६ बचतगटांतील ३९२ महिलांना एक कोटी २८ लाखांचे कर्ज देण्यात आले. शहरी गरिबांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमातून शहरातील गरीब मुलामुलींना स्वयंरोजगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून ५६१ जणांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व योजनेतून गरीब नागरिक विविध व्यवसाय आणि वस्तूंची निर्मिती करतात. त्यांच्या या वस्तूंची विक्री व्हावी आणि बाजारपेठ मिळावी, यासाठी आधार केंद्र स्थापन करीत असल्याचे महापौर अमृतकर यांनी सांगितले. हे केंद्र सुरू झाल्यावर जिल्ह्यातील बचतगट आणि परजिल्ह्यातील गटांतील उत्पादित माल येथे विक्रीसाठी ठेवता येईल. भानापेठ येथील पंडित नेहरू प्राथमिक शाळा आणि राजे धर्मराव प्राथमिक शाळेमध्ये आधार केंद्र तयार करण्यात येत असून, या इमारतीत इन्टेरिअर आणि ङ्कर्निचर बसविण्यात आहे. यापूर्वी असा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने केला होता. त्याच धर्तीवर या केंद्राची निर्मिती केली जात असून, आवश्यक निधी मनपाच्या निधीतून खर्च करण्यात येणार असल्याचे अमृतकर यांनी सांगितले.
----------------
- दारिद्य्ररेषेखालील
- १२ हजार १९- कुटुंब
- ५३ हजार ७२३ -नागरिक
- ------------------
- शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम
- ९३ -लाभार्थी
- एक कोटी सात लाख- कर्जवाटप
- ------------------------
- शहरी महिला स्वयंसहायता कार्यक्रम
- ६६- बचतगट
- एक कोटी २८ लाख- कर्जवाटप
- -----------------------
- शहरी गरिबांसाठी प्रशिक्षण
- ५६१-मुलामुलींना व्यवसाय प्रशिक्षण
- -----------------------