सावली तालुक्यातील निमगांव येथिल श्रमिक एल्गारच्या महीलांनी 144 बाटल दारू वाहतुक करतांना पकडुन पाथरी पोलीसांचे हवाली केले आहे.
श्रमिक एल्गार कार्यकत्र्यानी मागील वर्षाभरापासुन गावात मोहीम राबवुन दारूबंदी केली आहे. अनेकदा दारू विक्रेत्यांना पकडुन पोलीसांचे हवाली केले आहे. येथील महीला पहाटे 3 वाजता बस स्थानक परीसरात धबा धरून बसले असता दुचाकी वाहनाने दारूच्या पेटया आणतांना संशय आल्याने पकडण्यासाठी गेले मात्र दारूतस्कर गाडी फिरवुन पळाला परंतु त्याचे तिन पेटया खाली पडल्याने महीलांनी जप्त केले आहे. सदर दारू विक्रता हा व्याहाड खुर्द येथील रवि नामक असल्याचे महीलांनी बयानात सांगीतले आहे व सदर दारू ही व्याहाड खुर्द येथील नरसिंग गणवेणवारची असल्याने त्याचेवर कारवाई करण्याची मागणी महीलांनी केली आहे.
सदर मोहीमेत सुनिता प्रभाकर झाडे, कल्पना गजानन झाडे, येनुबाई वसंत झाडे, सविता रूमाजी डोबी, मिराबाई कुसन झाडे, आत्माराम झाडे, आनंदराव झाडे, रूपेश चिमुरकर सहभागी होते.