Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१३

मित्रानीच केला मित्राचा खून


सिंदेवाही- सिंदेवाही पो. स्टे. अंतर्गत येणाÚया ठकाबाई तलावाजवळील पुलाखाली प्रेत लपवून ठेवल्याचे दि. 17 एप्रिल 2013 ला उघडकीस आले. सदर घटनेचा उलगडा सिंदेवाही पोलीसांनी केला असून सदर प्रकरणात  आरमोरी तालुक्यातील दोन आरोपीना अटक केली असून 4 मे पर्यंत पी सी आर घेण्यात आला आहे.
     सविस्तर वृत्त असे की दि. 17 एप्रिल 2013 ला सिंदेवाही-आरमोरी रोडवरील ठकाबाई तलावाजवळील पूलाखालील पाइपध्ये प्रेत लपवून ठेवल्याची माहीती सिंदेवाही पो. स्ट. ला देण्यात आली. अप. क्र. 32/ 13 भा. द. वी. क. 302, 201 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. मृताची ओळख न पटल्याने अप्पर पोलीस अघिक्षक सेजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सूरु केला. परीसरातील प्रत्येक गावातून हरविलेल्या व्यक्तीची माहीती घेण्यात आली. ही माहीती घेत असताना आरमोरी तालुक्यातील कुलकुली गावातील संतोष वासुदेव गेडाम वय 35 हा बेपत्ता असलाचे कळले. पो. नि. महिपाल सिंग चांदा स्टाफसह कुलकुली गावातील मयताची पत्नी सौ. शितल व त्याची आई यांना संतोषचे कपडे दाखवले असता त्यांनी कपडे ओळखले. घटना दि. 17 एप्रिलला दारु पिण्यासाठी सोबत घेवून जाणारे आरोपी निखील दिवाकर ठाकरे, रमेश परसराम तुलावी वय 35 रा. कुलकुली गावात नसल्याने त्यानीच घातपात केला असावा या संशयावरुन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मारहाणीत मृतकाच्या 3 फासळ्या तुटल्याचा रिपौर्ट प्राप्त झाला. आरोपीनी गुन्हा कबूल केला. परंतु असे करण्षचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा उलगडा पो नि महिपालसिंह चांदा यांनी केला. यात हे. कॉं. हिरामण पराते, चांगदेव गिरडकर, ना. पो. का. सुरेश बोरकुट,े सतीश नेवारे, अरविंद गेडाम, ललीत धुंदे, चालक वसंता सिडाम, प्रदीप वडगावकर, यांनी सहकार्य केले.  आरोपी घटनेच्या दिवशी प्रेत लपवलेल्या ठिकाणी सायंकाळपर्यंत थांबले होते. प्रेत आणलेल्या गाडीतील डिझेल संपल्याने त्यांना पुढे जाता आले नाही. गाडी चालक दारु पिउन होता तर दुसरा घाबरलेला होता. गाडीच्या सिटवर रक्त सांडलेला होता. कारगाटा येथील नागरीकानी विचारले तर अपघातातील व्यक्तीला आणले, रक्त नाही गुळाचे डाग आहेत असे सांगितले. गाडी ट्रॅक्टरने ओढत कारगाटा पर्यंत आणले. गावात गाडीतील डेक विकून रॉकेल विकत घेतले. सायंकाळी  रवाना झाले. दरम्यान नागरिकांनी जागरुकता दाखवली असती तर आरोपी तेव्हाच जाळ्यात अडकले असते.
   
   


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.