चंद्रपूर- वाहतूकदाराकडून दोन हजारांची लाच घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रतापसिंग परदेशी यांना पोलिस प्रशासनाने निलंबित केले.
प्रतापसिंग परदेशी यांच्यासह दोघांना दोन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांचा रायटर व पोलिस शिपाई देवानंद अलोणे , असे अटकेतील अन्य आरोपीचेनाव आहे . त्यांच्या अटकेनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी व धुळे जिल्ह्यातीलजिलानी येथील परदेशी यांच्या घराची झडती चालू केली आहे . १४ ऑगस्ट २०१२ पासून ते गोंडपिपरी येथे तैनात आहे . ट्रॉन् स्पोर्ट व्यावसायिक मनोज वनकरयांना परदेशी यांनी लग्नसराईदरम्यान कार चालविण्यासाठी दहा हजारांची मागणी केली होती. अलोणे यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली होती. २० एप्रिलला वनकर यांनी परदेशी यांना आठ हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित दोन हजार रुपयांसाठी परदेशी यांनी वनकर यांचा छळ चालू केला. वनकर यांनी लाच लचुपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. गोंडपिपरी येथे तैनातीपूर्वी परदेशी ब्रह्मपुरी येथे कार्यरत होते . त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता, अशीही चर्चा आहे