शिवसेना जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर यांच्यावरील तडीपारी स्थगित
जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना चंद्रपुरसह ६ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते या तडीपारीने चंद्रपुर जिल्हयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कारवाईला स्थगिती दिली
सप्टेंबर २०१२ मध्ये हा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्याला धानोरकर यांनी गृहविभाग स्तरावर आव्हान दिले होते. अंतिम निर्णय नुकताच जाहीर झाला असून धानोर्कारांच्या तडीपारीवर गृह विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
बाळू धानोरकर यांचेवर दाखल असलेले २००६ पासूनचे अनेक गुन्हे यासाठी गृहीत धरण्यात आले आहेत. ही कारवाई २ वर्षांसाठी करण्यात आली आहे. बाळू धानोरकर यांच्याविरोधात एकूण २३ गुन्हे न्याय प्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात दरोडा, सरकारी कामात अडथळे, हल्ला, मारहाण , जीवे मारण्याच्या धमक्या, दारुंबंदी , सरकारी मालमत्तेचे नुकसान यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर व चंद्रपुर या ६ जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात गेले १० वर्षे भद्रावती ही एकमेव नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे.