Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ३०, २०१३

बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न सुटणार

महापौरांची वर्षपूर्ती : स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ

चंद्रपूर : पंचशताब्धी वर्षानिमित्त वर्षानिमित्त मिळालेल्या निधीसह विविध निधीतून शहराचा विकास साधला जात आहे. रस्ते, गटारलाईन, बाबूपेठ उड्डाणपूलबाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात राज्यसभेचे माजी सभापती स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती महापौर संगीता अमृतकर यांनी दिली.
चंद्रपूरच्या पहिल्या महापौर संगीता अमृतकर यांच्या कार्यकाळा मंगळवारी वर्ष पूर्ण झाला. या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर अमृतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंचशताब्धी वर्षानिमित्त २५० कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले. त्यातील २५ कोटी प्राप्त झाले आहेत. या निधीतून शहरातील मुख्य रस्ते बांधकाम, नवीन भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकणे व शहरातील मुख्य मार्गावरील भूमिगत विद्युत वाहिनीचे काम हाती घेण्यात आले. त्याचे काम सुरू आहे. एकात्मिकगृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत ५७० घरकुलांकरिता निविदा प्राप्त असून, २०३ लाभाथ्र्यांनी हिस्सा भरणा केलेला आहे. २०२ घरकुलांचे बांधकाम सुरू केलेले असून, १८७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे काम सुरू आहे, असे महापौर अमृतकर यांनी सांगितले. बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात राज्यसभेचे माजी सभापती स्व. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूरचे. दलित चळवळ उभारून त्यांनी आंबेडकरी विचार जनमानसात पोहोचविला होता. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी ११ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्यावर टपाल तिकीटही प्रकाशित करण्यात आले होते. बॅरि. खोब्रागडेंच्या कार्याची आठवण सदोदित राहावी म्हणून स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली होती. त्या स्मारकाची जागा बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळा परिसरात नियोजित करण्यात आली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सभागृहाच्या पायव्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील आपत्कालीन घटनांवर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेकडे असलेली अग्निशमन यंत्रणा आता आधुनिक स्वरूपात सज्ज होत आहे. केंद्राचे बांधकाम, वाहन खरेदीसाठी १९० लाख ८२ हजारांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. सद्य:स्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडे दोन ङ्कायर वॉटर टेन्डर आणि एक ङ्कोम टेन्डर ही वाहने आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, महाऔष्णिक वीजकेंद्र, कोळसा खाणी, इलेक्ट्रोस्मेंट, सिमेंट कारखाने, असल्याने केव्हाही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे अग्निशमन दलाचे बळकटीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा अभियानांतर्गत निधी प्राप्त झाला आहे. यातून अग्निशमन केंद्राचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी ८२ हजार आणि तीन अग्निशमन वाहनांच्या खरेदीसाठी ९० लाखांचा निधी असा एकूण एक कोटी ९० लाख ८२ हजारांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी ४७ लाख ५० हजार रुपये महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. पत्ररिषदेला स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, संतोष लहामगे, प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.